चंद्रपूर::(19 ऑगस्ट)::
👉”खाकी हीच राखी ” असा संकल्पित प्रचार जरी जाणवत असला मात्र तरी आपल्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या, सुरेक्षेसाठी नेहमी तत्पर राज्यातील आणि जिल्ह्यातील पोलीस प्रशासन च्या मदतीसाठी नेहमीच एक माणुसकीचा धडा चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक गतीविधिने दिला आहे.
👉आज रक्षाबंधन चा दिवस उजळत असताना या खाकीतील मानवीयता असलेला आपल्या परिवारातला एक असा खाकी चा भाऊ!
आपल्या सदैव कर्तव्याचा चोवीस तास प्रणाली चे आव्हानातमक तत्पर तेने काम करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना राखी च्या बंधनात बांधत शालेय मुलींनी अभिनव परिचय दिला!
चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रशासन नेहमी महिलांच्या सुरक्षेसाठी चोवीस तास तत्परतेने जागृत आहे!
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि महिलांवर होणारे अत्याचार संबंधी योग्य प्रणाली मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक यांची यावर करडी नजर असते. भरोसा सेल असो की दामिनी पथक की चार्ली त्यांचे चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी कटीबद्ध उपाय योजना वेळोवेळी राबवल्याने महिलांच्या सुरक्षेत वाढ़ झाल्याने गुन्ह्यांची नोंद घसरली आहे. खाकी हीच राखी जरी असली तरी पण त्या खाकीतही माणुसकी चा आधार आहे. हे तितकेच खरे ‼️
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

