चंद्रपूर 21 ऑगस्ट(बुधवार)
सुशांत घाटे
✨✨✨✨✨
👉 दृढ विश्वास असला की संधी चे सोने आपोआप च पदरी पडत असते, समाजकारण असो की राजकारण भाग्याची साथ भेटली की एक प्रगतशील व्यक्तिमत्व म्हणून व्यक्ती समाजात अस्तीत्वात येत असतो.
✨महाराष्ट्रात विधानसभा निवडूनकीचे बिगुल वाजतात उमेदवारी चे पारडे आपल्याला भेटो यासाठी अनेक उमेदवारांची लांबलचक यादी तयार होत असताना म्हणजे निवडणुकीसाठी अर्ज भरत पक्षातर्फे आपल्याला तिकीट देण्याचे प्रयत्न विविध नेते आप आपल्या पद्धतीने हाथाळत असतात.
✨✨✨
👉नावालौकिक असाच एक चेहरा सध्या चंद्रपूर विधानसभे साठी काँग्रेस पक्षा तर्फे चर्चित आला आहे. राजकारणाचे कुठलेही समीकरण नाही पण ज्या खात्यात नौकरी केली, त्या खात्याला राजकारणाचा पूर्ण आराखडा माहिती असलेला आणि चंद्रपूर -यवतमाळ – नागपूर जिल्ह्यातील नौकरीचा कार्यकाळ गाजवत पूर्णतः ठाणेदारीचा तडफदार कर्तृत्वाचा चेहरा मोहरा म्हणजे सेवानिवृत्त ठाणेदार “सुधाकर आंभोरे “यांचा?
✨काँग्रेस पक्षातर्फे त्यांच्या तिकीट ची अधिकृत घोषणा जरी नाही झाली मात्र ते चंद्रपूर विधानसभेचे जवळपास 90% काँग्रेस चे उमेदवार असल्याचे बोलल्या जातं आहे.
राजकारणाचा छंद जरी नसला तरी या सेवानिवृत्त ठाणेदारा ला आता आमदारकीचे तिकीट भेटणार आणि दुहेरी थेट लढत काँगेस आणि विरुद्ध पक्षात होणार हे तितकेच खरे!
👉✨अंबोरे यांच्या कडे चंद्रपूर विधानसभेतला दांडगा संपर्क पाहता त्यांनी घुघूस, चंद्रपूर आणि स्थानिक गुन्हे शाखेत पोलीस विभागातील कर्तव्य पार पाडले आहे. जनमाणसात त्यांची प्रतिमा ही गुन्हेगारी प्रवृतीला ठेसा देणारी होती!
✨त्यांचा स्वभाव जरी रागीष्ट असला मात्र त्यांच्यात उत्तम गुणवत्ता म्हणजे चुकीला माफी नाही! तो जवळचा असो की दूरचा, त्यांच्या कार्यकीरर्दीत त्यांच्यावर मारहानीचे ही आरोप लावण्यात आले. विशेष म्हणजे त्यांना एका व्यापारी मारहाण प्रकरणात त्यांची स्थानिक गुन्हे शाखेतून उचल बांगडी ही करण्यात आली होती. मात्र कालांतराने त्यांचे कधी भाजप च्या नेत्याशी जवळीक तर कधी काँग्रेस च्या नेत्याशी जवळीक हा कधीच अंदाज आला नाही की ते राजकारणी पायत्याशी येऊन ठेपेल.
💥राजकारणाचा मोह त्यांना ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन च्या सेवानिवृत्त होण्याच्या आधीपासून त्यांच्यात रुजला, काँग्रेस चे दिग्गज नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांच्या कितीतरी कार्यक्रमात त्यांची जवळीक पाहवयास मिळाली होती. त्यानंतर हळू हळू त्यांनी आपला अंदाज चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात फिरवत आपण निवडणुकी साठी सज्ज असल्याचे दिवंगत खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्याकडे त्या वेळेस जवळीक वाढवत काँग्रेस कोट्यातून लढण्याची तयारी “सुधाकर अंबोरे “यांनी दर्शवली!
✨✨पाहता पाहता वेळ काळ जवळ येत असताना आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले! दावेदार कितीही असले मात्र सक्षम दावेदाराला च मैदानात उतरवण्याचा पवित्रा काँग्रेस पक्षा तर्फे घेण्यात येणार असल्याचे बोलल्या जातं आहे.
👇👇
वर्तमान आमदार किशोर जोरगेवार यांची राज्याच्या वरिष्ठ पातळीवर ओळख जरी असली मात्र त्यांना 200 युनिट चा दिलेला आश्वासन पाळण्यात अपयश आल्याचे चित्र सध्या सामान्य जनतेत चर्चेत बोलल्या जात आहे. काँग्रेस तर्फे निश्चित मानल्या जाणाऱ्या सुधाकर अंबोरे यांची तिकीट हायकमांड मोड वर शिक्का मोर्तब ची वाट बघत आहे. मात्र तिकीट वाटपाच्या आधी त्यांनी आपला जनसंपर्क पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दिशेने चौकट केला आहे. येणारी चंद्रपूर विधानसभा निवडणूक ही तितकीच काटेरी आणि आरोप प्रत्यारोप च्या संघर्षात आवाज करणार आहे. पण सध्या सेवानिवृत्त ठाणेदार म्हणजे आमदार चा दावेदार म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मुखाट्यातून पडत आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

