Tuesday, November 24, 2026
HomeBreaking Newsवेकोलिच्या 'लफंगे' किसन चा.. अश्लील चावा घेत संतापजनक कारनामा! ५९ व्या वर्षी...

वेकोलिच्या ‘लफंगे’ किसन चा.. अश्लील चावा घेत संतापजनक कारनामा! ५९ व्या वर्षी किरायादार तरुणीच्या रूममध्ये शिरत केला अर्धनग्न चाळ्याचा कारभार!

खळबळजनक बातमी:

वेकोलिच्या ‘लफंगे’ किसन चा.. अश्लील चावा घेत संतापजनक कारनामा! ५९ व्या वर्षी किरायादार तरुणीच्या रूममध्ये शिरत केला अर्धनग्न चाळ्याचा कारभार!

​चंद्रपूर (प्रतिनिधी):
वयाच्या ५९ व्या वर्षी डोक्यात तरुणईचे भूत सवार झाल्याचा एक अत्यंत संतापजनक व मान खाली घालायला लावणारा प्रकार चंद्रपुरातील दुर्गपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. वेकोलिमध्ये (WCL) नोकरीला असलेल्या एका विकृत घरमालकाने शिक्षणासाठी व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी भाड्याने राहणाऱ्या तरुणीच्या खोलीत मध्यरात्री किंवा सकाळी अनधिकृतपणे घुसून अक्षरशः तांडव घातले. स्वतःच्या बायकोचे सुख मिळत नाही म्हणून या म्हाताऱ्याने चक्क महाविद्यालयीन तरुणीला आपले शिकार बनवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुणीच्या धाडसामुळे या भामट्याचा पर्दाफाश झाला असून दुर्गापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे!

​🔥 नेमकं काय घडलं त्या दिवशी?
​पीडित २० वर्षीय तरुणी गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथील असून ती सद्यस्थितीत चंद्रपुरातील तुकूम परिसरातील रेणुका माता गेट, हनुमान मंदिर जवळ, शिवनेरी गार्डन मागे भाड्याने खोली करून राहते.
​३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास पीडित तरुणी आपल्या रूममध्ये झोपलेली होती, तर तिची मैत्रीण शारीरिक चाचणीच्या तयारीसाठी बाहेर गेली होती.

​याच संधीचा गैरफायदा घेत मकानमालक किसन रामचंद्र गुंजेकर (वय ५९ वर्ष) या नराधमाने विनापरवाना थेट मुलीच्या रूममध्ये प्रवेश केला.
​रूममध्ये शिरताच या भामट्याने बेशरमपणाची सर्व हद्द पार करत, “मला माझ्या पत्नीपासून काही सुख मिळत नाही, ती फक्त औषधी खाऊन झोपते,” असे अंगलट येणारे संभाषण सुरू केले.
​एवढेच नव्हे तर, स्वतःचे कंबरेखालील कपडे खाली करून या म्हाताऱ्याने त्या तरुण मुलीला आपले अर्धनग्न व अश्लील अंग प्रदर्शन केले.

​😱 भितीने थरारली तरुणी, अन् पुढे काय झाले?
​अचानक घडलेल्या या प्रकारामुळे ती तरुणी प्रचंड घाबरली. तिने जिवाच्या आकांताने आरडाओरडा करत तिथून पळ काढला आणि बाजूच्या रूममध्ये राहणाऱ्या मैत्रिणींकडे धाव घेतली. घडलेला सर्व प्रकार मैत्रिणींना सांगितल्यानंतर त्या सर्वानी मिळून घरमालकाची पत्नी ‘सिंदु गुंजेकर’ यांना याची माहिती दिली.
​पण नवल म्हणजे, बायकोने पतीला तंबी देण्याऐवजी उलट पीडित मुलींचीच खिल्ली उडवली आणि त्यांची टिंगल केली.
​या विकृत प्रकारामुळे आणि असुरक्षिततेच्या भावनेने त्या सर्व मुलींनी क्षणाचाही विलंब न करता ती रूम खाली केली आणि दुसरीकडे निघून गेल्या.

​⚖️ पोलिसांचा दणका: मध्यरात्री गुन्हा दाखल!
​या प्रकरणी पीडित तरुणीने हिंमत दाखवत थेट दुर्गापूर पोलीस ठाणे गाठले आणि प्रभारी पोलीस निरीक्षक युवराज सहारे सहकाऱ्यांसमोर आपली तक्रार मांडली. पोलिसांनी त्वरित कायदेशीर पावले उचलत आरोपी वेकोलि कर्मचारी किसन रामचंद्र गुंजेकर याच्यावर खालील कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे

🔥भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ कलम ७४:
​कलम ७५(१)
​कलम ३३२:
​गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच या जवान भामट्याचा बीपी वाढल्याची जोरदार चर्चा परिसरात रंगली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज वासाडे करत आहेत.
​
🌟मोठे सवाल: निष्पाप मुलींच्या सुरक्षेचे काय?

​शिक्षणासाठी चंद्रपुरात येणाऱ्या तरुण मुली जर अशा वेकोलिच्या अर्धनग्न ‘किसन’सारख्या विकृत लोकांपासून सुरक्षित नसतील, तर पालकानी आपल्या मुलींना पाठवायचे कुठे?

​वेकोलि प्रशासनासारख्या मोठ्या विभागात अशा प्रकारची मळमळीत मानसिकता बाळगणारे कर्मचारी अद्याप कामावर कसे काय कार्यरत आहेत? चंद्रपूर पोलीस अशा दलिंदर आणि विकृत प्रवृत्तीच्या लोकांना आता कोणता कडक खाक्या दाखवणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे!

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!