चंद्रपूर( 21 नोव्हेंबर)
सुशांत घाटे
चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा क्षेत्रातील सट्टा बाजारात आकडे सध्या फिरकू लागले आहे.
चंद्रपूर, राजुरा, वरोरा, ब्रम्हपुरी, बल्लारपूर आणि चिमूर मध्ये कुठे दुहेरी तर कुठे तिहेरी लढत या मतदार संघात पाहायला मिळाली आहे. राज्यात सत्तेसाठी वेगवेगळ्या एक्सिट पोल नी महायुती आणि महाआघाडी साठी आकडेवारी दर्शवली आहे.
विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस आणि भाजप मध्ये सध्या सट्टा बाजाराला उधाण आले आहे.काय आहे सट्टा बाजारात ले बुकिंचे भाव . कोणाचा आहे बोलबाला बघा आकेडवारीत..
चंद्रपूर विधानसभा –
किशोर जोरगेवार (भाजप )- 85 पैसे
प्रवीण पडवेकर (काँग्रेस )- 1₹15 पैसेराजुरा विधानसभा –
सुभाष धोटे (काँग्रेस) – 95 पैसे
वामनराव चटप ( शेतकरी संघटना )-95 पैसे
देवराव भोंगळे (भाजप )-3 रुपयेवरोरा विधानसभा
करण देवतळे ( भाजप )-30 पैसे
मुकेश जिवतोडे (अपक्ष )-2₹30 पैसे
प्रवीण काकडे (काँग्रेस )- 5 रुपयेचिमूर विधानसभा
सतीश वारजुरकर ( काँग्रेस )- 90 पैसे
बंटी भांगडिया (भाजप )-97 पैसेबल्लारपूर विधानसभा क्षेत्र
सुधीर मुनगंटीवार ( भाजप )-65 पैसे
अभिलाषा गावतुरे ( अपक्ष )- 1₹ 90 पैसे
संतोष रावत (काँग्रेस )- 1₹ 95 पैसेब्रम्हपुरी विधानसभा
विजय वड्डेटिवार – 20 पैसे
कृष्णलाल सहारे – 5 रुपयेसहाही विधानसभा संदर्भात सट्टा बाजारात निवडणुकीचे अंदाजित सट्टा बाजाराचा कौल काँग्रेस आणि भाजप च्या फेव्हरेट ला खुलला आहे. गुलाल कोण उधळवणार हे 23 नोव्हेंबर ला च माहिती होईल!
चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा मध्ये मात्र ब्रह्मपुरी विधानसभा ही काँग्रेस च्या हाती एक हाती असताना दिसत आहे. मात्र अन्य जागेवर शनिवार हा कोणावर प्रसन्न आणि शनी होईल हे तेव्हाच स्पष्ट होणार हे नक्की!
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

