चंद्रपूर 14 नोव्हेंबर
विधानसभा च्या रनधुमाळीत एकीकडे राजकीय पक्षाचा प्रचाराचा वेग वाढत आहे तर दुसरीकडे कोंबडं बाजाराच्या झुंज वर ही आंबट शौकीनाची तोबा गर्दी जमत आहे.
अशाच प्रकारे लपून छपून कोंबडं बाजार भरवणाऱ्याना भद्रावती पोलीस स्टेशन च्या हद्धीत तिरवंजा परिसरात स्थानिक गुन्हे शाखे च्या पथकाने धाड मारत सात लोकांना अटक केली आहे.एक लाख पंच्यातर हजार रुपयाचा मुद्देमाल जब्त केला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मधुकर सामलवार यांच्या पथकाने केली आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

