चंद्रपूर जिल्हा पोलीस दलात फेरबदल; 15 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश
चार पोलीस निरीक्षकांना नव्या जबाबदाऱ्या; 8 अधिकाऱ्यांचे विनंती अर्ज अमान्य
चंद्रपूर, दि. 28 सप्टेंबर 2026 |
चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या प्रशासकीय रचनेत महत्त्वपूर्ण फेरबदल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी रविवारी जिल्ह्यांतर्गत 15 पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्ती/बदल्यांचे आदेश जारी केले. यामध्ये चार पोलीस निरीक्षकांना नव्या ठिकाणी जबाबदारी देण्यात आली असून, काही सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षकांनी केलेले बदलीचे विनंती अर्ज अमान्य करण्यात आले आहेत.
आदेशानुसार पोलीस निरीक्षक विनोद रहांगडाले यांची नियंत्रण कक्ष, चंद्रपूर येथून पोलीस स्टेशन कोरपना येथे नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक लता वाडवे यांची कोरपना येथून पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे बदली करण्यात आली. पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांची चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यातून प्रभारी अधिकारी, जिल्हाविशेष शाखा, चंद्रपूर या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांची सिंदेवाही येथून पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे बदली करण्यात आली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षकांमध्ये राजेंद्र सोनवणे यांची नियंत्रण कक्षातून सायबर पोलीस ठाणे येथे, तर गोरखनाथ दहिकले यांची नियंत्रण कक्षातून पोलीस स्टेशन वरोरा येथे नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशांत लभाने यांची रामनगर पोलीस ठाण्यातून उप पोलीस स्टेशन लाठी येथे बदली करण्यात आली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षकांमध्ये राजेंद्र सोनवणे यांची नियंत्रण कक्षातून सायबर पोलीस ठाणे येथे, तर गोरखनाथ दहिकले यांची नियंत्रण कक्षातून पोलीस स्टेशन वरोरा येथे नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशांत लभाने यांची रामनगर पोलीस ठाण्यातून उप पोलीस स्टेशन लाठी येथे बदली करण्यात आली आहे.
दरम्यान, काही अधिकाऱ्यांनी बदलीसाठी केलेल्या विनंती अर्जांना या आदेशात मंजुरी मिळालेली नाही. पोलीस निरीक्षक योगिता चापले, सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सहारे, मनोज खडसे, रमेश नन्नावरे आणि अनिल राऊत, तसेच पोलीस उपनिरीक्षक रविंद्र झांके, भारत धिटे आणि अशोक मरसकोले यांच्या विनंती बदल्या अमान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे अधिकारी सध्याच्या नियुक्तीच्या ठिकाणीच कायम राहणार असल्याचे आदेशातून स्पष्ट होते.
या फेरबदलात पोलीस ठाण्यांबरोबरच जिल्हा विशेष शाखा, सायबर पोलीस ठाणे आणि नियंत्रण कक्ष अशा महत्त्वाच्या शाखांचाही समावेश आहे. शासनाने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात निश्चित केलेल्या धोरणानुसार तसेच पोलीस महासंचालकांच्या आदेशान्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हा बदली आस्थापना मंडळाच्या सर्वानुमते हे आदेश काढण्यात आल्याचे अधिकृत आदेशात नमूद आहे.
संबंधित शाखा व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या फेरबदलामुळे कोरपना, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, वरोरा यांसारख्या पोलीस ठाण्यांना नवे अधिकारी मिळणार असून जिल्हा विशेष शाखा आणि सायबर विभागातही नवीन जबाबदारी निश्चित झाली आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

