चंद्रपूर -2 मे 2025
(सुशांत घाटे )💢बनावट दारू विक्री चा सर्रास खेळ चंद्रपूर जिल्हायात सुरु असताना माश्या मारत बसलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाची जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी चांगलीच कानउघडनी करत जोरदार सुनावत चांगलाच संताप राज्य उत्पादन शुल्क च्या अधीक्षक कडे व्यक्त केला आहे.
🌻गेल्या दोन महिण्याच्या अंतरात तीनदा बनावट दारू चा मोठा जखीरा चंद्रपूर पोलिसांनी पकडला मात्र फक्त वसुलीच्या छत्रछायेत हरवलेल्या काही उत्पादन शुल्क च्या अधिकाऱ्यांनी बनावट दारू ला ग्रीन सिग्नल दिला आहे की काय असा प्रश्न निर्माण केला आहे?चंद्रपूर जिल्ह्यातील कितीतरी देशी भट्टी तसेच बार मध्ये सर्रास बनावट देशी – विदेशी दारू ची विक्री करीत असल्याचे उघड झाले आहे.
🌻फक्त 2300 रुपया मध्ये देशी दारू ची डुप्लिकेट पेटी विकणाऱ्यांची टोळी चंद्रपूर जिल्हायात सक्रिय आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या डुप्लिकेट दारू विक्रेते आणि पैशाच्या आमिषात लोळणारे बार धारक यांच्यावर उत्पादन शुल्क विभाग केव्हा कारवाई करेल हे बघण्या सारखे आहे.
💢थोरात च्या अंगाला थरकाप सुटला…..💢अवैध दारू विक्री ची कारवाई साठी वरोरा उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक विकास बबन थोरात हे आपल्या गल्लेलठ संपूर्ण स्टाफ सहित माढेळी ला पोहचले….
टार्गेट वर असणाऱ्या गजानन वादाफळे यांच्या पानठेल्यावर ते पोहचताच त्यांना थरकाप सुटला, कारण कारवाई करताना आजपर्यंत घेतलेला लक्ष्मी चा प्रसाद त्यांना थर्रर्रर्र करत होता.
पण कारवाई दाखवायचे दात जरा वेगळेच होते, माहिती का पुरवली हा त्यां मागचा जगदीश आणि थोरात चा राग होता!
15 देशी दारू चे टिल्लू घेऊन कारवाई करणारे या अधिकाऱ्यांनी मात्र बाकीच्यांना सोडून यालाच धमकवत बसले, याच्या साथी साठी भोज्यालाही जगदीश ने पाचारानं केले आणि धंदा करायचा असेल तर जे आहे ते करावेच लागणार आणि इकडे तिकडे सांगू नका नाहीतर याद राखा असा सज्जड दम देऊन गेले.
पण ज्या माढेळी मध्ये देशी भट्टी आहे तिथे अवैध देशी दारू विक्री कशी होते याचा जावई शोध घेताना मात्र हाच निरीक्षक भट्टीच्या पेट्रोलपम्प ऑफिस मध्ये गप्पा हाणत बसला होता.
आर्थिक हितसंबंध असणाऱ्या या अधिकाऱ्याची बदली या महिन्यात आहे. मात्र तीन वर्षाच्या या कार्यकाळात करोडोचा भ्रष्टाचार या महाराथी ने केला आहे.
शेलार नावाचा खाजगी व्यक्ती विकास बबन थोरात यांनी शिपाई जगदीश म्हस्के सोबत वसुली साठी नियुक्त केला आहे?
या महिन्याची वसुलीसाठी हे फिरते पथक पुन्हा सक्रिय झाले आहे. बदली चे आदेश कधी ही येऊ शकतात या धास्तीने ताबडतोब वसुली करा असा आका नी मेसेज सोडला आहे.
मात्र केलेला हा भ्रष्टाचार कधीच लपणार नाही आणि चौकशी तर लागेलच आणि पूर्ण गौडबंगाल बाहेर येणार हे तितकेच सत्य!
⭐⭐⭐राज्य उत्पादन शुल्क विभागात खाजगी व्यक्ती ला उभारून वसुली?
🍁अवैध वसुली साठी जवळपास सर्वच राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी विश्वासातील खाजगी व्यक्तींना नियुक्त केले आहे.
भरारी पथक चे वाघ यांचा खाजगी व्यक्ती पंढरी चुदरी, कोल्हे साहेबांचा शैलेश राऊत, अभिजित लिचडे चा कैलास, भिवगडे चा नितेश, दरोडे, वासाडे असे अनेक नावे सध्या वसुलीसाठी जिल्हाभरात समोर येत आहे. लवकरच या बाबत विशेष वसुली वृत्त डेली पोस्टमार्टम सादर करणार आहे.
🥎🥎🍾75 करोड चा भ्रष्टाचार करणाऱ्या जगदीश पवार ची ACB ला होणार तक्रार?🚦
🚦🚦बार परवाने देताना घोळ करणाऱ्या तसेच नवीन लायसन्स देताना करोडोचा भ्रष्टाचार करणाऱ्या अल्पवधीतच करोडो रुपयाची माया जमवत शेती, प्लॉट, जेसिबी बंगलो उभारणाऱ्या जगदीश पवार यांची ACB ला तक्रार दाखल होणार आहे सोबतच SIT ला ही या बाबतची माहिती देण्यात येणार आहे.
चंद्रपूरातून दोन वर्षाच्या कार्यकाळात करोडो चा अंबर दिवा घेत नागपुरात एका अधिकाऱ्याच्या जवळ बसून स्वतः ला विदर्भ बॉस समजणाऱ्या या अधिकाऱ्याचा लवकरच कच्चा चिट्टा बाहेर येणार आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

