गडचिरोली
(22 नोव्हेंबर)
सुशांत घाटे
………………………
🌟गडचिरोली च्या न्यायालय आवारातील बार कौन्सिल च्या चेंबर ला चक्क वकील आणि काही लोक पत्यांचं जुगार खेळत असल्याने, कमालीच्या चर्चेला उधाण आले आहे.
🌟ही घटना आज शुक्रवार ची असून दुपारच्या सुमारास चक्क वकील आणि काई लोक या पत्यांच्या डावात गुंतलेले असताना आपल्या न्यायालयीन कामाकरिता आलेल्या एकाने याचा थेट विडिओ बनवत डेली पोस्ट मार्टम ला पाठवला आहे.
🌟कुणाची भीती न बाळगता कायद्याचे धडे, बाळगणाऱ्या कडून च तीन तेरा च वाजवल्याने नेमकी वकिली पेक्षात आपले पत्यांच्या डाव घेऊन न्यायालय परिसरात खेळणाऱ्या या महाशयना काय म्हणावे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
🌟गडचिरोली बार काउन्सिल च्या या चेंबर ला जणू जुगाराचा अड्डा यांनी बनवला का असा मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे? काही खासगी लोक आणि वकिलांना या ठिकाणी हा जुगार खेळण्याचा मोह आवरता आला नाही का? की… ही.. ही..जागा अपुरी पडत आहे असे विविध चर्चा आता न्यायालय परिसरात रंगली आहे. खरेतर कायद्याच्या तरतुदीत यांना कुठलेही या ठिकाणचा परवाना नसताना बेधडक पत्यांवर डाव खेळणे म्हणजे अलिखित परवानगी आहे का? असे आता जनसामान्य नागरिकांतून बोलले जात आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

