Friday, April 17, 2026
HomeBreaking Newsआणखी कीती जणांचे जीव घेणार? रस्त्यात गड्डा आहे की गडयात रस्ता....

आणखी कीती जणांचे जीव घेणार? रस्त्यात गड्डा आहे की गडयात रस्ता….

चंद्रपूर /गडचिरोली
13 जुलै
एका काळात महाराष्ट्रातील सर्वात टॉप चा रोड म्हणून “चंद्रपूर ते सिरोंचा”या नावाचा उल्लेख व्हायचा,चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी सीमा ओलांडली की आस्टी ते सिरोंचा एक दम झणझणीत डांबर रोड असायचा! याच जिल्ह्यातील अहेरी बस आगारातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सर्वाधिक लांब पल्याच्या बसेस धावयाच्या मात्र,आता याच रूट वरील दुर्गती अशी झाली की “रस्त्यात गड्डे की गड्ड्यात रस्ता “ही म्हणण्याची वेळ आली आहे.
सुरजागड लोह प्रकल्प सुरु झाल्या नंतर दररोज हजारो च्या संख्येने जडवाहतूक या जिल्ह्यातून होऊ लागली आहे.

  • या जडवाहतुकी मुळे रस्त्याची इतकी बिकट अवस्था झाली आहे की चंद्रपूर ते आलापल्ली 120 KM रोड गाठण्यासाठी बस द्वारे पाच तासाचा अवधी लागत आहे. गोंडपिपरी ते आलापल्ली येथूनच 60 किलोमीटर अंतर हे रस्त्याच्या लांबलचक गड्ड्यामुळे तीन तासाचे झाले आहे. अनेक बसेस तर भंगार अवस्थेत झाल्याचे दिसत आहे. लोकांना या प्रवासामुळे कंबरदुखी चा मोठया प्रमाणात त्रास वाढू लागला आहे. ज्या रुग्णवाहिकेतून रुग्णांना अतिजलद गतीने पोहोचवता येत होते तीच रुग्णवाहिका या महामार्गांवर दम तोडू लागली आहे. चारचाकी वाहणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे, कितीतरी वाहने रोड च्या कडेला बंद अवस्थेत पडलेले दिसत आहे. वाहणाचे तसेच प्रवाश्याचे बेहाल होत असताना मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग चादर ओढून झोपला आहे.
  • नेत्यांची आवाजातली क्षमता या लोहखनिज प्रकल्प च्या समोर दबकी झाली आहे. नको इतके हाल होत असताना जवाबदार असणाऱ्या त्या ट्रकांची लांबलचक लाईन च गोंडपिपरी ते आलापल्ली पर्यंत रोड वर दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात या महामार्गावर अपघात झाले आहे. शेकडो लोकांना या ठिकाणी अपघातात प्राण गमवावे लागले आहे. तरी मात्र प्रशासनाला अद्याप जाग आला नाही. रस्त्याची इतकी दुरावस्था झाली आहे की एकदा प्रवास केला की दुसऱ्यांदा प्रवास करासाठी दहादा विचार करावा लागतो किंव्हा दुसरा मार्ग निवडावा लागतो. अहेरी बस आगाराने सुद्धा बसेस या रूट वरून कमी करून टाकल्या आहे. अनेक बसेस आगाराच्या आवारात नादुरस्त अवस्थेत पडल्या आहे. अनेक खासगी वाहनांना सुद्धा मोठ्या प्रमाणात या मुळे आर्थिक आणि शारीरिक भुर्दंड मोजावा लागत आहे. रस्त्यात गड्डा की गड्ड्यात रस्ता ही म्हणण्याची वेळ आली आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!