Wednesday, August 26, 2026
HomeBreaking Newsउत्पादन शुल्क चे आयुक्त डॉ.राजेश देशमुख नी दिले कारवाईचे आदेश!

उत्पादन शुल्क चे आयुक्त डॉ.राजेश देशमुख नी दिले कारवाईचे आदेश!

मुंबई / चंद्रपूर
18 मे 2025……

राज्य उत्पादन शुल्क विभागातील भ्रष्टाचार आणि अनियमितता तसेच अनागोंधी कारभाराची दखल राज्य उत्पादन शुल्क विभागातील आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी घेत त्वरित कारवाईचे आदेश काढले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील छप्पर फाड भ्रष्टाचाराच्या केंद्रात असणाऱ्या उत्पादन शुल्क विभागातील काही अधिकाऱ्यानी वसुली गुरग्या आणि कर्मचाऱ्या मार्फत जिल्ह्यात वसुली अभियान चालवले आहे.
चंद्रपूर चे जिल्हाधिकारी विनय गौडा नंतर आता खुद्द महाराष्ट्र चे राज्य उत्पादन शुल्क चे आयुक्त यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील चाललेल्या भ्रष्टाचारा वर लक्ष केंद्रित करत कारवाई चे आदेश काढले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील निरीक्षक विकास बबन थोरात, राजुरा येथील निरीक्षक अभिनंदन केरबा कांबळे, आणि ईश्वर वाघ यांची प्रमुखतेने तर इतर ही समाविष्ट कर्मचाऱ्यांची आणि अधिकऱ्यांची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!