चंद्रपूर::
(10 ऑगस्ट )✨
समाजातील समसेच्या प्रश्नाला,कर्तव्य पूर्ण कार्यक्षमता ठेव्हत त्या आव्हानाला ठसनी नी आंदोलनाच्या माध्यमातून सडेतोड उत्तर विचारणारा आणि जागेवर काम करून घेणाऱ्या युवक काँग्रेस चा एक दमदार चेहरा म्हणजे प्रशांत भारती नावाचा तरून सध्या आपल्या कामाच्या कर्तृत्वाने ओळखल्या जात आहे.

दिवगंत खासदार बाळू धानोरकर यांच्या तालमीत तयार झालेला हा युवा नेतृत्व तितक्याच जोशाने कुठलीही पर्वा न करत आंदोलनाच्या दिशा ठरवून समाजातील समस्याचा मार्ग निकाली काढतो.
चंद्रपूर शहरातील तुकूम परिसरातून आपली ओळख निर्माण करीत या तरुण नेतृत्वाने मित्रांची आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी बनवत आपले राजकीय कार्यक्षेत्र अमलात आणत त्याला कटाक्ष पद्धतीने हाताळले, हळू हळू नागरिकांच्या समस्या सोडवण्यास त्याने प्रामुख्याने जन आंदोलन ही उगारले!
- आंदोलनातून मार्ग काढण्याचा त्याचा नेहमी साहसी पराक्रम राहीला, कधी प्रशासनिक अडचणी ही आल्या मात्र या तरुण नेतृत्वाने इंटक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष पद घेत आंदोलनाला अधीक तीव्र करीत प्रमुखतेने आवाज उठवला! न्याय देता की जाता करीत ठोकशाही चा ही प्रामाणिक पद्धतीने उपयोग केला!

दुर्गापूर परिसरातील नागरिकांच्या समस्या च्या रोज वेगवेगळ्या तक्रारीला स्वतः समोर उपस्थित राहून त्या समस्या निपटवण्यात या युवकांने यश संपादन केले.
तुकूम च्या परिसरातील नुकताच रस्त्यात गड्डे आणि बांधकाम विभागाच्या धुळीने लोकांच्या समस्या वाढत असताना प्रशांत भारती ने धूळ फेक आंदोलन करीत प्रशासनाला जाग आणला! समस्या सोडवणारा एक कर्मठ,जिद्दी आणि प्रभावी वक्ता म्हणून प्रशांत ची राजकारणात, सामाजीक ओळख निर्माण झाली आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

