चंद्रपूर- 23 एप्रिल 2025
(सुशांत घाटे)
राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांच्या हफ्ते खोरीचे वृत्त धडकताच काल दिवसभर राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी आणि कर्मचारी एक मेकांकडे तो मी नव्हे म्हणत बोट दाखवू लागले!
तो विकास कोन करत शोधत राहले पण विकास मात्र उडन छू होता?
भ्रष्टाचाराचे मूळव्याध झालेला हा विकास अधिकारी जिल्ह्यापासून कोसो दूर जाऊन बदली च्या प्रयत्नात चांगल्या पोस्टिंग साठी भिडला असल्याचे वृत्त आहे!
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक धार्मिक यांनी जिल्ह्यातील सर्व उत्पादन शुल्क विभागातील कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल यांना काल कानपिचक्या दिल्या असल्याचे सूत्रांनी माहिती दिली आहे.
“जो करेल तो भरेल” मात्र डिपार्टमेंट च्या आत मधील गोष्टी ह्या मीडिया पर्यंत जाऊ देऊ नका असा सज्जड दम धार्मिक यांनी कर्मचाऱ्यांना भरल्याचे वृत्त आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातून हफ्तेखोरीत प्रथम क्रमांक पटकवनाऱ्या म्हस्के युनिट चा विकास नी करोडोची खेळी चंद्रपूर जिल्ह्यातून खेळली आहे.
लायसन्सी धारकांची अनियमितता लपवण्यासाठी विकास नेहमीच अग्रेसर असतो.
बेकायदेशीर लायसन्स वाटपा मध्येही या भ्रष्टाखोराचे चांगलेच पावले आहे.
भ्रष्टाचाराने ग्रासलेल्या विकास च्या संपत्तीचा लवकरच गावापासून ते शहरापर्यंत कसा समृद्धी चा मार्ग तैयार झाला आणि कोणाच्या तालमीत भजन केले याचे सविस्तर वृत्त लवकरच डेली पोस्ट मार्टम सादर करणार आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

