चंद्रपूर –
11 ऑगस्ट
जिल्हा सरकारी रुग्णालयात बहीनीला बघायला आलेल्या भावालाच,चाकू चा धाक दाखवून अकरा हजाराची रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावत दोन आरोपीनी पळ काढला असता शहर पोलीस स्टेशन च्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही तासातच आरोपीना बेड्या ठोकल्या आहे.
सदरची घटना ही नव तारखेला रात्री नव वाजताच्या सुमारास घडली होती.सुभाष प्रवीण मराठे वय (25 वर्ष )राहणार साखरवाही येथील फिर्यादी हा आपल्या बहिणीला रुग्णालयात बघायला आला होता. रात्री च्या सुमारास लगवी साठी सदर फिर्यादी गेला असता अंधाराचा फायदा घेत दोन युवक मोटार सायकल ने तोंडाला दुपट्टा बांधून फिर्यादीला चाकू चा धाक दाखवत आणि मारपीट करत 11 हजाराची रोख रक्कम आणि मोबाईल घेऊन पसार झाले.या बाबतची तोंडी तक्रार शहर पोलीस स्टेशन ला पोहचताच लगेच शहर पोलीस स्टेशन चे गुन्हे शोध पथकाने सीसीटीवी चित्रफित तपासत आरोपीनचा शोध घेतला.
यामध्ये” शुभम” उर्फ बांबु अमर समुद (28 वर्ष ) राहणार पंचशील चौक, चंद्रपूर या आरोपीस पोलिसांनी अटक करीत त्याकडून दहा हजार आणि गुन्ह्यात वापरलेला चाकू जब्त केला आहे. गुन्ह्यातील दुसऱ्या आरोपीचा शोध घेणे सुरु आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात शहर गुन्हे शाखा शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भोंगाडे, पोलीस उपनिरीक्षक संतोष निंबोळकर, पोलीस हवालदार महेंद्र बेसरकर, सचिन मुडे,सचिन बोरकर, इम्रान खान तसेच भावना रामटेके आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

