चंद्रपूर – 29 नोव्हेंबर
(सुशांत घाटे)
🍁जिल्ह्यातील दारूच्या प्रवाहात पूर्व–पश्चिम–उत्तर–दक्षिण अशा सर्व दिशांना पसरलेल्या मद्यविक्री दुकानांच्या जाळ्याने चंद्रपूर जिल्हा वेढला असताना, मनमौजीत वागणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात हफ्तावसुलीच्या विशिष्ट पद्धतीचे ‘जकात नाके’ स्वतःच्या मालकीप्रमाणे दलालांमार्फत उभारल्याचे आणि काही कर्मचाऱ्यांना अधिकृत वसुलीचे अधिकार बहाल केल्याचे वास्तव चित्र समोर येत आहे.
यासाठी कितीही अधिकृत अहवाल दिले गेले तरीही, त्यावर उपाय न करता उलट अनधिकृत आणि कृत्रिम पद्धतींचा अवलंब या विभागात वरचढ होत असल्याचे दिसते. कितीही मेमो काढले तरी वसुलीची पद्धत न बदलणारे काही कर्मचारी व दलाल आता जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात परवानाधारकांचे ऋणी बनवू लागले आहेत.
उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे दलालांमार्फत मद्य परवाना धारकांकडे वसुलीची प्रक्रिया उघडपणे सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. कारवाई असो किंवा वसुली—दलाल आणि कर्मचारी आधीच पोहोचून त्याची रूपरेषा ठरवत असल्याचे अनेकांनी सांगितले. एवढेच नव्हे, तर या व्यवहारांची ‘बॉटल बंद’ आर्थिक स्वरूपाची योजना तयार करून त्याप्रमाणे डावपेच रचले जात असल्याची चर्चा आहे.
💢अभिनंदन, किटारी, दरोड्या, कोल्ह्याचा चा जिल्ह्यात वसुलीचा आर्थिक धुमाकूळ
जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या दोन विशेष निरीक्षक अधिकाऱ्यांनी सध्या संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या ‘रोल’ आणि ‘कॉल’मुळे इतर दुय्यम निरीक्षक वर्गातील काही अधिकारीही आपली वसुली दुय्यम स्तरावरून प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी दलाल आणि काही अवैध दारू विक्रेत्यांशी हातमिळवणी करत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
राज्य उत्पादन शुल्क विभागातील एका अधिकाऱ्याच्या बाबतीत राज्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने काही गैरव्यवहारांबाबत प्रश्न उपस्थित करताच पायाखालची वाळू सरकली असल्याची माहिती आहे.
🍁हफ्तेखोरीत आल्या बनावाट पाचशे च्या नोटा?
जिल्ह्यातील धुमाकूळ माजवणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागातील एका निरीक्षकाला दलालांच्या वसुलीतून पाचशे रुपयाच्या बंडली मध्ये बावीस नोटा बनावट आल्याने त्या निरीक्षकाने चांगलीच कानउघडानी त्या दलालाची केली असल्याचे बोलल्या जात आहे.
वसुलीचा बांधलेला डल्ला कोल्हापूर येथील एका व्यापाऱ्याला देणाऱ्या त्या निरीक्षकाने दिला. कोल्हापूर येते पोहचून त्या व्यापाऱ्याने या निरीक्षकाला साहेब बंडलीत डुप्लिकेट नोटा आहे. असे सांगताच कसे काय.. कसे काय? करत थांबा शोध घेतो म्हणत एका मेडिकल दुकाना समोर दलाल आणि कर्मचाऱ्यांना सुनावले. याच्या पुढे पूर्ण चेक करून घ्या नाहीतर वसुली करू नका असे सांगितले, मात्र गेल्या तीन वर्षांपासून करोडो ची बोटी खाणाऱ्या नंदन ला कसं समजणार की हा भ्रष्टाचार आहे. याची श्याही कुठेही सुखत नाही!
💢तीन लाखाची मागणी, पण बार धारकांने म्हटलं नो?
काही दिवसा अगोदर एका बार धारकांवर वेळेच्या मर्यादेचे उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली. मात्र दर महिन्याला त्या बार धारकांने हफ्ता देत असल्याचे सांगितले, हो तुम्ही देता पण वरिष्ठांकडे तक्रार आली न त्या मुळे कारवाई करावी लागणार असे सांगितले. मात्र मधला मार्ग काढत असणार तर तीन लाख द्यावे लागणार तर कारवाई टळून जाईल असे त्या बार धारकांला सांगण्यात आले. मात्र त्या बार धारकांने साहेब मी नाही देऊ शकत चा पवित्रा घेतल्याने त्या अधिकाऱ्याने कारवाईचा ससेमीरा केला.
आणि कारवाई नंतर त्याचा अहवाल जिल्हाधिकारी महोदय कडे पाठवून दिला. अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचला आणि त्यावर जिल्हाधिकारी यांनी पाच दिवसांचे सील ठोकले! मात्र या कारवाईला तीन लाखाचा डल्ला दिला असता तर ही कारवाई टाळता आली असती अशी काही राज्य उत्पादन शुल्क विभागातील दलालांनी सबुरीचे सल्ले त्या बार धारकांला दिले.
भ्रष्टाचाराच्या कितीतरी अध्यायाने हफ्ते वसुलीचे जंजीर बनलेले राज्य उत्पादन शुल्क विभागातील लाचखोर, चाणक्य बनण्याच्या नादात आहे, पण चाणक्य नीती त अडकलेल्या या अधिकाऱ्याला मेमो आला आहे. लवकरच आणखी मोठ्या कारवाईचा बिगुल वाजणार असल्याचे सूत्रांनी माहिती दिली आहे.
“चाणक्य बनू नका…
कोडभाषेने जिल्हा चालत नाही!
जिल्हा आकड्यांनी हलतो आणि सत्याने थरथरतो!”
To be continue………
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

