नागपूर /भंडारा
(23 मे 2025)
सुशांत घाटे
…………………………………….
रेती चोरीची अलिखित परवानगी संबंधित विभागाने भंडारा जिल्ह्यात दिल्या असल्याची माहिती समोर येत आहे.
भंडारा जिल्ह्यातून तर नागपूर पर्यंत एका हायवा (ट्रक )मागे संबंधित विभागातील अधिकारी रेती चोरीची वाहतुकीचा परवाना देण्यासाठी दोन लाख अंशी हजार रुपये(280000₹) त्यां रेती माफिया कडून मोजून घेऊन राहल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा आणि नागपूर च्या क्षेत्रातून उघडकीस आला आहे?♻️भंडारा जिल्ह्यातील तुमसर, मोहाडी, पवनी आणि लाखांदूर हे रेती घाटाचे प्रमुख ठिकाण आहे.
वाळू डेपो ला सरकारी यंत्रणा अंतर्गत बरोबर विल्हेवाट लावत फक्त 10-15 हायवा ह्या रॉयल्टी मध्ये दाखवण्यात येत असून त्यां पाठीमागे 100-125 ट्रिप चोरीची करण्यात येत असल्याचा सर्रास प्रकार भंडारा जिल्ह्यात महसूल, खनिकर्म आणि पोलीस विभागाच्या अलिखित परवानगी चा दिलेला छुपा पाठिंबा आहे की काय अशी म्हणण्याची वेळ आली आहे?♻️भंडारा जिल्ह्यातून जवळपास 570 हायवा(ट्रक) दररोज नागपूर च्या दिशेने रेती ची चोरटी वाहतूक करीत आहे. ज्या ज्या विभागातून ही वाहतूक केली जाते. त्यां त्यां विभागाला प्रत्येक हायवा मागे लक्ष्मी चा प्रसाद महिन्याकाठी (एन्ट्री )दिली जाते.
♻️या प्रसादाचे मानकरी संबंधित विभागातील काही मोठे भ्रष्टखोर असून लॉबीन्ग फार्मुला बसवून बसल्याची गोपनीय माहिती डेली पोस्टमार्टम ला विश्वासनीय सूत्र ने दिली आहे.
या अलिखित दिल्या गेलेल्या परवानगी ला मोठ्या अधिकाऱ्यांचे ही पाठबळ भक्कम आर्थिक हितसंबंधात बांधल्या गेल्याचे बोलल्या जात आहे.
प्रत्येकाची एन्ट्री डिव्हिजन नुसार बांधल्या गेली आहे. भंडारा येथील पो… प्रमुख डिव्हिजन ला एका हायवा मागे 30000₹ ची एन्ट्री तर, खनी… च्या 15000₹ चा फार्मुला तसेच इतर विभागातील 10000₹ रुपयाचे पॉकेट रीतसर महिन्याकाठी 570 हायवा धारक अलिखित परवानगी च्या आड भ्रष्टखोर अधीकाऱ्यांच्या तोंडात कोंबत असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
नागपूर जिल्ह्यात एन्ट्री करताच मोहदा मधील एस डी… आणि तह…च्या प्रत्येक हायवा मागे 35000 ₹ टोकन बिल्ला दलाला मार्फत पोहचवल्या जात आहे.
तर नागपूर ग्रामीण च्या वरदहस्त असणाऱ्या प्रमुख मधल्या दोन टीम 10000 ची पावती फाडत आहे. बघा एन्ट्री चा कसा आहे तालमेळ…(.रूट)
1)तुमसर -एस डी…. -10000r₹(एक चोरीची वाहतूक करणारा हायवा अर्थात without रॉयल्टी )
तह…..तुमसर -10000₹
पो…. तुमसर 10000
2)मोहाडी…
तह…. 10000₹
पो…. 10000₹
3) वरठी पो… 10000₹
4)भंडारा शहर
पो… 10000₹
5)एल. सी…… भंडारा जिल्हा
30000₹
6)खनी.. जिल्हा भंडारा
15000₹
7)जवाहर नगर…
10000₹ एन्ट्री
8)भंडारा
तह/ एस डी 15000₹
9)वाहतूक भंडारा
5000₹
10)मौदा जिल्हा नागपूर
तह… एस डी…
35000₹
11)पो…. मौदा
10000₹
12)नागपूर जिल्हा एल… बी…
10000₹
13)पार्डी नागपूर पो….
10000₹
14)कलमना नागपूर…
10000₹
15) खरबी वाठोडा पो…
10000₹
16) हुडकेश्वर नागपूर पो…..
10000₹
17) रामटेक पो…. 10000₹
इतर खर्चा सहित हा एन्ट्री चा फार्मुला सध्या जोरदार संबंधित विभागातील भ्रष्टाचार यंत्रनेने गाजला आहे.
मोठे मोठे रथी महारथी या अभियानात आपल्या पोळ्या शेकत शासनाचा करोडो रुपयाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडवत आहे.
आज कोट्यवधीची रेती चोरी होत असताना महसूल, खनिकर्म आणि पोलीस विभागातील दुर्लक्षा मुळे रेती माफियाची हिम्मत वाढत आहे.
…….. क्रमशः……
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

