Saturday, June 6, 2026
HomeBreaking Newsवरोऱ्याच्या महानटवरलाल विनोद सोयाम नी चंद्रपूर च्या सराफा व्यापाऱ्याला 81 लाख 50...

वरोऱ्याच्या महानटवरलाल विनोद सोयाम नी चंद्रपूर च्या सराफा व्यापाऱ्याला 81 लाख 50 हजाराचा घातला “गंडा “

चंद्रपूर-10 नोव्हेंबर (सुशांत घाटे)

तो नटवरलाल च..नाही तर महा नटवारलाल निघाला याचे वास्तव्य चंद्रपूर शहरातील एका सराफा व्यापाऱ्याला आले.

🌟मित्राच्या साहाय्याने या 81 लाख 50 हजार रुपयाचा सराफा व्यापाऱ्याला गंडा घालणाऱ्या वरोरा येथील लबाडखोर, फसवेगिरी चा बादशाह विनोद सोयाम वर वरोरा पोलीस स्टेशन ला विविध कलमा अंतर्गत आर्थिक फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4 नोव्हेंबर रोजी विनोद सोयाम याने चंद्रपूर येथील सचिन डोंगरे यांच्या मदतीने सराफा व्यापारी अक्षय अमरचंद सोनी यांना सोन्याचा तुकडा दाखवत विक्री करायचे असल्याचे सांगितले.

त्यानुसार 5 नोव्हेंबर रोजी सोने व्यापारी यांना विनोद सोयाम यांनी रोख रकमेसह बोलावले त्यानुसार व्यापारी 81 लाख 50 हजार घेऊन गेले. व्यापाऱ्याकडून रोख रक्कम घेऊन सोने घेऊन येतो म्हणून विनोद सोयाम निघून गेला, मात्र त्यानंतर तो परत आलाच नाही. त्यानंन्तर त्याने 6 नोव्हेंबर रोजी नागपूर येथे सोने देतो असे सांगितले मात्र तिथेही या व्यापाऱ्याला फसगत मिळाली. त्यांनतर थेट या व्यापाऱ्याने आपली फसवणूक झाल्याची तक्रार पोलीस स्टेशन वरोरा येथें नोंदवली.

पोलिसांनी गुन्हा नोंद करत तपासाची चक्रे फिरवली आहे. जिल्ह्यात अनेकांना गंडा घालणाऱ्या या विनोद सोयाम नी बऱ्याच लुबाडनुक केल्याच्या चर्चा आहे. कधी कोणाकडून नौकरी लावून देण्याच्या आमिषाखाली पैसे लुटले, तरी कधी कोणाला दुबई येथें इन्व्हेस्टमेंट च्या नावाखाली तर कधी बनावट नोटा चा पुरवठा करून देण्याचा फार्मुला देत आतापर्यंत या महानटवर लाल बऱ्याच लोकांची फसवणूक केली आहे.
पोलिसांनी आव्हान केले आहे की, ज्या लोकांची फसवणूक या लबाडखोराने केली आहे या बाबत वरोरा पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवाव्ही.
पोलिसांनी विनोद सोयाम आणि सचिन डोंगरे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरु केला आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!