Tuesday, August 25, 2026
HomeBreaking News​खाकीचं गुपित की वासनेचा 'सस्पेन्स थ्रिलर'? चंद्रपूर पोलीस दलातील 'त्या' डजनभर अधिकाऱ्यांच्या...

​खाकीचं गुपित की वासनेचा ‘सस्पेन्स थ्रिलर’? चंद्रपूर पोलीस दलातील ‘त्या’ डजनभर अधिकाऱ्यांच्या रासलीलेची डायरी! वर्दी आडच्या ‘गुलाबी’ खेळाने चंद्रपूर हादरले… ‘डेली पोस्टमॉर्टम’चा सर्वात मोठा गौप्यस्फोट!

​.. कुणाला साड्या, कुणाला झुमके, कुणाला दिला ‘आयफोन’,
खाकीच्या या बाजारात, सांगा हसतेय मागे कोण?
चार-चार जणींवर उफाळलेलं, हे कसलं आलंय प्रेम,
वासनेच्या या हुतुतूमध्ये, टार्गेट मात्र एकदम सेम!

चंद्रपूर (-सुशांत घाटे )

कायद्याचे रक्षक की वासनेच्या खेळातील सराईत खेळाडू? असा प्रश्न पडावा, अशी एक अत्यंत संवेदनशील आणि तितकीच धक्कादायक माहिती ‘डेली पोस्टमॉर्टम’च्या हाती लागली आहे. चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातील तब्बल डजनभरहून अधिक बड्या अधिकाऱ्यांची एक अशी ‘गुप्त डायरी’ सध्याचर्चेत आली आहे, ज्यातील पानापानांवर खाकी वर्दीच्या चिंधड्या उडवणारे अनैतिक संबंधांचे किस्से दडलेले आहेत.

स्वतःच्याच विभागातील महिला कर्मचारी आणि काही ठराविक महिलांसोबत सुरू असलेली ही ‘खूळ-खूळ’ आता पोलीस वर्तुळातून थेट चव्हाट्यावर येण्याच्या मार्गावर आहे.

या रहस्यमयी खेळात ३ पोलीस निरीक्षक (PI), १३ सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) आणि २८ पोलीस उपनिरीक्षक (PSI) यांचे धागेदोरे जुळले असून, चंद्रपूर शहर ते थेट दुर्गम जिवतीपर्यंतच्या पोलीस ठाण्यांचे नाव यात बदनाम होत आहे?

💢गुलदस्त्यातील ‘तो’ बडा अधिकारी आणि ४ ‘मॅडम’!

​पोलीस दलात सध्या सर्वात जास्त चर्चा आहे ती एका ‘विशेष’ साहेबांची. या साहेबांचे हृदय एवढे मोठे आहे की, एकाच वेळी विभागातील तब्बल ४ महिला कर्मचाऱ्यांवर त्यांचे ‘प्रेम’ उफाळून आले आहे. सरकारी कर्तव्यात कसूर झाली तरी चालेल, पण मॅडमच्या सुखात कमी पडायला नको, अशी या साहेबांची ख्याती. मॅडमच्या आवडीच्या साड्या, कानातले महागडे झुमके आणि खिसा रिकामा करून थेट ‘अॅपल’ (Apple) कंपनीचे आयफोन गिफ्ट देणारे हे महाभाग नेमके कोण?

💢विशेष’ ब्रँच आणि एकाच वेळी तीन ‘अधिकारी’!

रहस्य इथेच संपत नाही. एका अत्यंत संवेदनशील आणि ‘क्राई… म….शेष ब्रँच’मध्ये कार्यरत असलेली एक महिला कर्मचारी सध्या एकाच वेळी तब्बल तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ‘गुलू-गुलू’ करण्यात मग्न असल्याची माहिती समोर आली आहे.

काही महिन्यांपूर्वी नागपूर रोडवर एका कारमध्ये ‘डान्सिंग डान्स’ करणाऱ्या त्या पोलीस उपनिरीक्षकाचे कारनामे असो, वा वय वर्ष पन्नाशी ओलांडूनही जवानीचा मोह न सुटलेले ‘ते’ पोलीस निरीक्षक असो, जे सरकारी गाडी सोडून खासगी वाहनाने ‘सुखकर प्रवासा’साठी नागपूर गाठतात… या सर्वांची कुंडली आता तयार झाली आहे.

💢​राजुराचा ‘प्लॉट’ आणि लाख रुपयांचे गुपित!

​मोबाईलच्या अतिवापरामुळे प्रेम कसं उतू जातं, याचं जिवंत उदाहरण राजुरा भागात पाहायला मिळालं. एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे (API) सूत एका प्रचलित महिलेशी जुळले. मात्र, प्रेम जेव्हा डोक्यावरून गेले, तेव्हा महिलेने थेट ‘प्लॉट’ची मागणी लावून धरली. प्रकरण पोलीस ठाण्याच्या वेशीवर जाण्याआधी आणि नाचक्की टाळण्यासाठी ‘लाख’ मोलाचा तोडगा काढून प्रकरण दाबण्यात आले. मात्र, ‘स्वभाव जाईना निसर्गा’ या उक्तीप्रमाणे हा अधिकारी आजही त्याच ट्रॅकवर भिरकटत आहे.

👉​वासनेची ही ‘हुतुतू’ थांबणार कधी?

​वर्धा, नागपूर, भंडारा, यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर अशा विदर्भातील पोलीस दलाला काळिमा फासणारे हे अनैतिक संबंधांचे रेकॉर्डतोड किस्से आता उजेडात येत आहेत. कामाच्या नावाखाली सुरू असलेला हा वासनेचा बाजार आणि त्यातून पेटलेली अंतर्गत वात लवकरच मोठा स्फोट घडवून आणणार, यात शंका नाही.
​कुणाला समोसा मिळाला, कुणाला जिलेबी… कुणाला पिझ्झावर खुश केले, तर कुणाला थंडगार आयस्क्रीम भरवून गप्प करण्यात आले… या संपूर्ण ‘मेन्यू कार्ड’चे आणि वासनेच्या या छडीचे रहस्य आता हळूहळू समोर येणार आहे

, कुणाला झुमके, कुणाला दिला ‘आयफोन’,
खाकीच्या या बाजारात, सांगा हसतेय मागे कोण?
चार-चार जणींवर उफाळलेलं, हे कसलं आलंय प्रेम,
वासनेच्या या हुतुतूमध्ये, टार्गेट मात्र एकदम सेम!

….. PART -1……

.कुणाला समोसा, कुणाला पिझ्झा, कुणाला दिली जिलेबी,
कथा अजून संपलेली नाही, डायरी आहे खूपच मोठी;
पार्ट-१ मध्ये ट्रेलर दिसला, पिक्चर अजून बाकी आहे,
खाकीच्या या अंधाऱ्या रात्रीची, ‘पोस्टमॉर्टम’ साक्ष आहे!

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!