चंद्रपूर -16 ऑगस्ट 2025
( *सुशांत घाटे )*
नियम, नियमावली, कायदा आणि त्याचे परिपत्रक याचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी सरकार GR (राजपत्रित अध्यादेश ) काढते.
मात्र काही अधिकाऱ्यांनी या आदेशा विरुद्ध जात, स्वतःच्या आर्थिक हिताच्या उन्नतीसाठी, ठेंगा दाखवत घोळ करण्यात आनंद वाटतोय की काय?….
🍁दोन भावंडा चा खेळ! बहिणींना केलं आऊट….
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तहसील अंतर्गत येणाऱ्या स्वास्ती येथे दोन भावंडांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना, हाताशी धरत चक्क एक भाऊ आणि तीन बहिणींना त्यांच्या वारस हक्कातून डावलत,CL-3 देशी दारूच्या दुकानाला मंजुरी घेण्यासाठी चक्क बनावट कागदपत्रे आणि बनावट सही करत राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्याला पास आऊट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
🎯बडे मिया, छोटे मिया चा मंजुरी खेळ?
💢मे.जे टी चन्ने अनुग्याप्ती CL-III स्वास्ती या लायसन्स मध्ये तीन भाऊ आणि तीन बहिणीचा वाटा असतांना ही 2025-2026 या वर्षाच्या नूतनीकरणासाठी या सर्वांची कायदेशीर पद्धतीने उपस्थिती असणे, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या समोर गरजे चे असतानाही, कुठलीही पडताडणी न करता राज्य उत्पादन शुल्क विभागातील राजुरा येथील दुय्यम निरीक्षक अतुल भिवगडे आणि निरीक्षक अभिनंदन कांबळे यांनी या लायसन्स ला स्वतःच्या आर्थिक हितापोटी लाखोचा व्यवहार करत सरसकट आठ महिन्यापूर्वी राजुरा राज्य उत्पादन शुल्क विभागातून मंजुरीचा अहवाल आयुक्त राज्य उत्पादन शुल्क चंद्रपूर मार्फत पाठवला
असल्याचे उघडकीस आला आहे.
मात्र प्रत्यक्षात ज्यांचा वारसदार म्हणून हक्क होता, ते त्या ठिकाणी उपस्थिती तच नसल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.
🛞पोलिसात तक्रार… गुन्हे दाखल…
🌟खोटे कागदपत्रे आणि बनावट सही करत मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांची तक्रार आता थेट पोलीस स्टेशन राजुरा ला फिर्यादी सुनीता कृष्णा खामणकर यांनी 10 ऑगस्ट ला नोंदवली आहे.
राजुरा पोलिसांनी याचा तपास करत फिर्यादी च्या तक्रारी वरून सचिन जग्गनाथ चन्ने व भाऊराव जगन्नाथ चन्ने या दोन्ही भावा विरुद्ध खोटे कागदपत्रे आणि फसवणूकीचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.
या
💢राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांचे संगणमत!
👮♂️राज्य उत्पादन शुल्क विभागातील नेहमीच कधी अवैध वसुलीवरून, तर कधी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोपात प्रकाश झोतात येणारे राज्य उत्पादन शुल्क विभागातील “बडे मिया आणि छोटे मिया” म्हणून ओळखले जाणारे राजुरा येथील निरीक्षक अभिनंदन कांबळे आणि दुय्यम निरीक्षक अतुल भिवगडे हे आता या पोलिसांच्या रडारवर आले आहे.या प्रकरणात प्रत्यक्षात वस्तुस्थिती माहिती असतानाही या दोन्ही ही अधिकाऱ्यांनी आयुक्त कार्यालयाचा GR धूडकावत आरोपीशी संगणमत केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असल्याचे विश्वसनीय माहिती आहे.
🛞पोलिसांचा बारीक तपास.. कायदेशीर खाक्या दाखवणार… गोविंद चाटे, तपास अधिकारी, राजुरा
🍁राजुरा येथील तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गोविंद चाटे यांनी या प्रकरणाचा बारकाईने तपास करत वास्तविक सत्य समोर आणले आहे. त्यासाठी त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागातील या दोन्ही ही अधिकाऱ्यांना या संदर्भात विचारणा केली. मात्र पोलिसांच्या मूळ रूपाशी परिचित नसलेल्या या अधिकाऱ्यांनी गोलमोल उत्तर दिल्याचे गोपनीय माहिती आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या अधिकाऱ्यांना कायदेशीर पद्धतीने वाजवान्यास पोलीस विभागाने आता कायदेशीर पोलिसी खाक्या बाहेर काढला असल्याची माहिती आहे. तीन दिवसांच्या आत माहिती द्या, अन्यथा अल्टीमेटम देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
👇👇👇👇
…….काय आहे अल्टीमेटम!
1) आपण दिलेली CL-3मंजुरी ला आपल्या आयुक्त कार्यालयाच्या 2018 GR नुसार आपण पडताडणी केली का?केली असेल तर कसे?
2) आपली नियमावली (SOP).. मंजुरीच्या गाईड लाईन
3) आपल्या ला या गुन्ह्यात का म्हणून आरोपी बनवन्यात येऊ नये याचे लेखी उत्तर दिन दिवसात नोंदवावे….
💢वसुलीतला……असा ही अधिकारी?
राज्य उत्पादन शुल्क विभागतील अनेक भ्रष्टाचाराच्या गाथा समोर येत आहे. मात्र यांचा पैशांचा लोभ यांना काही सुटेनासा झाला आहे?
कारवाई सुरु असतानाही लायसन्सी धारकांकडून महिन्या च्या वसुली गल्ल्यात या महिन्याचाही 13 ऑगस्ट पर्यंत 10 लाखाचा कोठा पूर्ण करण्यात त्या निरीक्षकाने बाजी मारली आहे. सोबतच दोन प्रोपोजल पास आऊट मध्ये 7 लाख रुपयाची ही तोडी केली असल्याचीही विश्वसनीय माहिती आहे.
शिफ्टिंग आणि नवीन राणी चा व्यवहार या अधिकाऱ्याला सुवर्ण घशात ओतला आहे.
लवकरच त्या संदर्भात विस्तृत माहिती….
## DAILY POSTMARTEM NEWS
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

