Saturday, June 6, 2026
HomeBreaking Newsराजुरा पोलीस काढणार टॉवर लोकेशन! राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ......

राजुरा पोलीस काढणार टॉवर लोकेशन! राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ… पोलिसांनी कसला शिकंजा

चंद्रपूर 17 ऑगस्ट 2025

(सुशांत घाटे )

 राज्य उत्पादन शुल्क विभागातील अनागोंधी कारभारावर राजुरा पोलिसांनी ताशेरे ओढत नोटीसी बजावल्या आहे.

मे. जे. टी.चन्ने CL-3 (देशी दारू दुकान )प्रकरणात नूतनीकरणासाठी वारसदारांचा हक्क डावलून खोटे कागदपत्रे आणि बनावट सह्या चा आधार घेऊन दोन भावंडांनी राज्य उत्पादन शुल्क च्या अधिकाऱ्यांशी संगणमत करून परवाना नूतनी करून घेतला असल्याचे राजुरा पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.

 प्रत्यक्षात कायद्याला तिरंजली देत राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक अभिनंदन कांबळे आणि दुय्यम निरीक्षक अतुल भिवगडे यांच्यावर पोलिसांच्या नजरा वळल्या आहे.

 सहा वारसदार असताना फक्त दोन भावंडांनी हा खेळ बनावट कागदपत्र आणि बनावट सहीच्या आधारे या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर खेळला आहे.

 राजुरा पोलिसांनी आता थेट संपूर्ण प्रकरणाचा तपास अत्यंत बारकाईने करत घटनेच्या दिवशीचे संपूर्ण टॉवर लोकेशन काढणार असल्याचे डेली पोस्टमार्टम शी बोलताना सांगितलेले आहे.

 राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उडवा उडवी उत्तराला,कायद्याने चोपणार असल्याचे राजुरा पोलिसांनी नवीन नोटीस देत तीन दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे. मात्र कार्यालयात कोणीच हजर नसणाऱ्या, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राजुरा कार्यालयात शुकशुकाट निर्माण झाला आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!