चंद्रपूर 7 जुलै
💥- बल्लारपूरातील मालू वस्त्र भंडार या सर्वात मोठ्या शहरात वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या दुकानावर अज्ञात आलेल्या दुचाकीवरच्या युवकांनी दुकानाच्या बाहेरून अंधाधुंद गोळीबार केल्याने बल्लारपूरात खळबळ माजली आहे.
चंद्रपूर जिल्हा हा क्राईम कॅपिटल कडे वाटचाल करीत असल्याने मोठा हाहाकार माजत चालला आहे.पुन्हा एकदा या दिवसा ढवळ्या झालेल्या गोळीबाराने गुन्हेगारी प्रवृत्तीने पोलिसांची डोकेदुखी वाढवली आहे. या गोळीबाराने दुकानातील एका व्यक्तीस पायाला गोळी लागल्याने त्याला तात्काळ चंद्रपूर ला हलवल्याचे वृत्त आहे. पोलिसांचा ताफा घटना स्थळी पोहचला असून CCTV फूटेज पोलिसांनी हाथी घेतले आहे. पुन्हा एकदा या घटनेने जिल्ह्यात बंदुकीचे आणखी कीती फायर होणार आणि कीती घटना मुळे दहशत निर्माण होणार याची जनसामान्य नागरिकांना भीती निर्माण झाली आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

