Thursday, August 27, 2026
HomeBreaking Newsमहाराष्ट्र पोलीस: गृह खात्याचा 35 पोलीस उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची बदल्यांचा शेवटचा टप्पा...तर...

महाराष्ट्र पोलीस: गृह खात्याचा 35 पोलीस उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची बदल्यांचा शेवटचा टप्पा…तर पोलीस निरीक्षक ते SDPO च्या लिस्ट चा ही गृह विभागाचा ऑर्डर…..

चंद्रपूर 7ऑगस्ट 2025
(सुशांत घाटे )
महाराष्ट्र पोलीस विभागातील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या शेवटचा टप्पा आज 40 अधीकाऱ्यांच्या बदली संदर्भात झळकला आहे. बदली साठी झटापट करणाऱ्या अधिकाऱ्यांची गृह विभागाने आज लिस्ट बहाल केली आहे. गृह विभागाला आदेश काढताना महाराष्ट्र पोलीस विभागातील बरेच बदलीच्या प्रतीक्षेतील असलेल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात विलंब लागला! 

🌟🍁दोन पोलीस निरीक्षक परत जिल्ह्यात SDPO म्हणून वरोरा आणि मूल मध्ये रिवर्स!

🍁सत्यजित आमले हे मूल चे नवीन पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांनी यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील घुघूस आणि गडचांदूर पोलीस निरीक्षक पदी सेवा बहाल केली आहे. त्यांना जिल्ह्यात परत रिवर्स गेर देत त्यांची पदस्थापना करण्यात आली आहे. तर दुसरीकडे चिमूर येथील पोलीस निरीक्षक संतोष बकाल यांना प्रमोशन देत वरोरा येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची जवाबदारी देण्यात आली आहे. वरोरा येथील पूर्वी IPS अधिकारी असणाऱ्या नयोमी साटम यांच्या जागेवर बकाल यांची वर्णी लावण्यात आली आहे. 

राकेश जाधव ब्रम्हपुरी तर दिनकर ठोसरे चिमूर उपविभागीय पोलीस अधिकारी!
ब्रम्हपुरी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांची चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे दोन वर्षाचा कार्यकाळ करून परत चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर उपविभागीय पोलीस अधिकारी अधिकारी म्हणून नियुक्ती घेतली आहे! अनेक तर्क वितर्क लागत असताना राजकीय डावपेच मधून ही नियुक्ती झाली असल्याचे सध्या याचे जिल्ह्यातील पोलीस विभागात कुतूहूल झाले आहे.

तसेच चिमूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांची अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे बदली झाली होती. मात्र गृह खात्याने त्यांच्या बदली ला परत रिवर्स गेर देत चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी उपविभागीय पोलीस अधिकारी पदी नियुक्ती दिली आहे.
जिल्ह्यातील पोलीस विभागातील सध्या पूर्ण चित्र जरी भरले नसतील मात्र जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा कुठेही कमतरता न येऊ देण्यात तितकीच कार्यक्षम असल्याचे ही पाहायला मिळत आहे.चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन सॉलिड सुपर मॅन म्हणून गुन्हेगारी ला संपुष्टात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिसी विभागानी अक्षरशः गुन्हेगारी जगतात धुवा धुवा चा कोहराम मचवला आहे.
…………….
बघा ही उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची यादी……..

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!