ACB चा ट्रॅप.. RTO चेक पोस्ट वर… मोटर वाहन निरीक्षक जाळ्यात….
चंद्रपूर -22 फरवरी 2025
महाराष्ट्र-तेलंगणा सीमावर्ती असलेल्या उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या लक्कडकोट चेक पोस्ट वर भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या अमरावती पथकाने काल मध्य रात्री सहाय्यक मोटर पोलीस निरीक्षका विरुद्ध लाचेच्या मागणी संदर्भात कारवाई केल्याची विश्वसनीय माहिती येत आहे. तक्रार दार हा तेलंगणा राज्यातील असून त्याला लाच मागितल्याने त्याने ACB च्या अमरावती युनिट ला तक्रार केली. त्यां तक्रारी च्या आधारावर काल रात्री ACB ने कारवाई करीत सहाय्यक मोटर निरीक्षक विभुते यांना 500 रुपये लाचेच्या मागणी संदर्भात गुन्हा दाखल करत कारवाई सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

