चंद्रपूर( 6 जुलै )-
💥स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मनसे कामगार अध्यक्ष अमन अंदेवार यांच्यावर झालेल्या चंद्रपूरातील रघुवंशी कॉम्प्लेक्स मधील गोळीबार प्रकरणात नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथून दोन संशयतीना ताब्यात घेत चौकशी साठी चंद्रपुरात आणले आहे.
👉पोलीस अधीक्षक मुंम्मका सुदर्शन यांनी या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्याकडे जलद गतीने करण्यास सोपवला होता.
दरम्यान या गोळीबारीसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक गेल्या दोन दिवसापासून या गुन्ह्याच्या बारीक गोष्टीवर नजर ठेवून तपास करीत असताना याचे धागे नागपूर जिल्ह्याच्या दिशेने लागले असता स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल एकरे व त्यांच्या पथकाने दोन संशियित युवकांना ताब्यात घेत या प्रकरणकचा तपास सुरु केला आहे. दरम्यान या संशियातला ताब्यात घेत असताना एक संशयित हा उत्तर प्रदेश ला पळाल्याचे बोलल्या जातं आहे. पोलिसांचे विविध पथक या गुन्ह्यावर लक्ष केंद्रित असून आणखी काही लोकांना या गुन्ह्यात अटक होण्याची पोलिसांकडून शक्यता वरतवण्यात येत आहे. गोळीबाराचे मुख्य कारण काय आहे हे तपासा नंतर माहिती होणार तूर्तास पोलिसांच्या हाथी संशियित लागल्याने हा गुन्हा लवकर उघडकीस येणार असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.