Thursday, April 16, 2026
HomeBreaking NewsIPS अधिकाऱ्याने उच्च शिक्षित MBBS तरुणीचे केले शारीरिक शोषण! बलात्काराचा IPS अधिकाऱ्यावर...

IPS अधिकाऱ्याने उच्च शिक्षित MBBS तरुणीचे केले शारीरिक शोषण! बलात्काराचा IPS अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल…

IPS अधिकाऱ्यावर बलात्कार चा गुन्हा!

नागपूर:13 एप्रिल 2025

अवघ्या वयाच्या 25 व्या वर्षात IPS बनणाऱ्या यवतमाळ चा दर्शन दुगाड वर नागपूरच्या इमामवाडा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ माजली आहे.

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर लग्नास नकार दिल्याच्या अनेक घटना घडतात. या घटनांमध्ये पोलिस आरोपी प्रियकराला अटकही करतात. परंतु, पोलिस खात्यातील एका आयपीएस अधिकाऱ्यानेच लग्नाचे आमिष दाखवून उच्चशिक्षित डॉक्टर युवतीचे शोषण केल्याची घटना इमामवाडा पोलिस ठाण्यांतर्गत घडली. पोलिसांनी आरोपी आयपीएस अधिकाऱ्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. दर्शन दुगाड (३०, रा. यवतमाळ) असे बलात्कार करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याचे नाव आहे.

सध्या तो नंदुरबार जिल्ह्यात उपविभागीय पोलिस अधिकारी पदावर कार्यरत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती एका खासगी महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत होती. आरोपी आयपीएस अधिकारी दर्शनची तिच्यासोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली. त्यांच्यात नियमित चॅटिंग होऊ लागले आणि ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दरम्यान, आरोपी दर्शनने तिला केरळमध्ये फिरायला नेऊन शारीरिक संबंधाची मागणी केली. युवतीने नकार दिल्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवले व शारीरिक संबंध प्रस्थापीत केले. त्यानंतर इमामवाडा परिसरातील एका लॉजमध्ये देखील तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. २०२२ ते २०२५ दरम्यान त्यांच्यात शारीरिक संबंध झाले. परंतु, दर्शन आयपीएस अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर लग्नाची मागणी करणाऱ्या डॉक्टर युवतीला शिवीगाळ करून लग्नास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित डॉक्टर युवतीने इमामवाडा पोलिसांत तक्रार दाखल केली. इमामवाडा पोलिसांनी आयपीएस अधिकारी दर्शन दुगाड विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अजनीचे सहायक पोलिस आयुक्त नरेंद्र हिवरे करीत आहेत.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!