Tuesday, August 25, 2026
HomeBreaking Newsपंचनामा! जिल्ह्याला पोलीस अधिकाऱ्यांचे ग्रहण.. एकटा कॅप्टन काय करणार?

पंचनामा! जिल्ह्याला पोलीस अधिकाऱ्यांचे ग्रहण.. एकटा कॅप्टन काय करणार?

नागपूर /चंद्रपूर
15 एप्रिल 2025
सुशांत घाटे

🌟गतिमान चक्र, कायद्याला तडजोड न करणाऱ्या, शौर्य पुरुस्कृत महाराष्ट्र राज्याच्या पोलीस विभागातील धावपटीवरच्या उत्तम महीला IPS अधिकारी असणाऱ्या राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांना चंद्रपूर जिल्ह्यात विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

एकटा कॅप्टन काय करणार?

👉चंद्रपूर जिल्ह्यातील वाढलेल्या गुन्हेगारी ला आटोक्यात आणण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन सदैव प्रयत्नशील योजनेत असतात. मात्र एकटा कॅप्टन या जिल्ह्यासाठी काय करणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे?

जिल्ह्यातील काही निवडक पोलीस निरीक्षक आणि एक दोन पोलीस उपविभागीय अधिकारी सोडले तर सर्व जवाबदारी पासून पळताना पाहायला दिसत आहे.
आपल्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्था न सांभाळू शकणाऱ्या अशा पोलीस विभागातील अधिकाऱ्यांचा अहवाल घेऊन त्यांच्याकडून तात्काळ पदभार काढण्याची गरज निर्माण झाली आहे.
स्वतः पोलीस अधीक्षकांना जर रात्री फिरून पानठेले बंद करण्याची वेळ येत असेल तर काय म्हणावे…तब्बेतीतून अस्वस्थ असणारे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन स्वतःची पर्वा न करत जिल्ह्यातील प्रत्येक हालचाली वर लक्ष वेधून असतात मात्र बेपर्वाह असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना कुठलीच पर्वा नसताना पाहायला मिळत आहे.
अगदी 112 च्या कॉल साठी सुद्धा तक्रार आल्यास ते स्वतः धावतात त्यांची धाडस वृत्ती ही जिल्ह्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
जिल्ह्यातील चांगल्या पोलीस अधिकाऱ्यांची कमतरतात असल्याने हा मोठा फटका बसत असल्याचे चित्र दिसत आहे.मुम्मका सुदर्शन यांच्या
कारवाई च्या वेगवान धडक्याने सध्या जिल्ह्यातील गुन्हेगारी जरी कमी झाली.
मात्र जिल्ह्यातील काही पोलिस अधिकाऱ्यांची निष्क्रियत्ता आपल्या हद्दीतील गुन्हेगारी वर अंकुश लावू न शकल्याचे चित्र अद्यापही दिसत आहे.
विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव कॅप्टन स्वतः पोलिसिंग वर भर देत गुन्हेगारी वर आळा घालत आहे.

🧭महीला अधिकारी ही पुढे!
अतिरिक्त पोलीस अधीक्षक रीना जनबंधू ही पोलीस अधीक्षक यांच्या जोडीला साथ देत जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्नशील राहतात.
आता त्यांचा कार्यकाळ जिल्ह्यातील होत असल्याने त्यांच्या ठिकाणी कोन येणार याचीच चर्चा जास्त होत आहे.

🧞विदर्भातील तीन अधिकारी चंद्रपूर साठी प्रयत्नशील?

चंद्रपुरात आपली वर्णी लागावी या साठी तीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रपूर साठी फील्डिंग लावत आहे!
आमदार ते मंत्री पासून फील्डिंग लावणाऱ्या पूर्व विदर्भातील दोन तर पश्चिम विदर्भातील एक अधिकारी सध्या लॉबीन्ग वर भिडले असल्याचे विश्वासनीय वृत्त आहे.
जिल्ह्याला दर्जेदार अधिकाऱ्यांची गरज आहे त्यामुळे किमान नियुक्ती देताना चंद्रपूर जिल्ह्याला कडक पोलीस विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती देण्याची गरज आहे.

⭕⭕उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची कमी!

⏮️जिल्हायात सात उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची व्याप्ती आहे. त्यापैकी फक्त दोनच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील ताण देण्यात आला आहे. कामाची व्यापत्ता बघता त्यांनाही कमालीची तारांबळ होते.
काही उपविभागीय पोलीस अधिकारी तर चंद्रपूर जिल्ह्यात शो-पीस झाले आहे.
कामाचा कुठलाही आढावा न घेणाऱ्या उपविभागीय अधिकाऱ्यांना फक्त मलाई खाण्याची आदत झाली आहे?

💢IG डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांचेही लक्ष!

🔅चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण होताच स्वतः पोलीस महानिरीक्षक भेट देत पूर्ण वस्तुस्थिती जाणून घेतात व पोलीस अधीक्षकांना हाथळण्याच्या योग्य त्या वेळोवेळी सूचना देतात.
त्यांनाही बोगस पोलीस निरीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची माहिती आहे.
त्यामुळे येणाऱ्या बदल्या मध्ये दर्जेदार अधिकारी त्यांच्याकडून जिल्ह्याला भेटणार अशी अपेक्षा आहे.
जिल्ह्यातील कॅप्टन असणाऱ्या मुम्मका सुदर्शन स्वतः ग्राउंड रूट वर कार्यरत जरी असले पण जिल्ह्यातील निष्क्रिय असणाऱ्या अधिकाऱ्यांना धडा कोन शिकवणार हा मोठा प्रश्न आहे?

🛞काही अधिकाऱ्यांना हवे मनमार्जितलं ठाणे?

🔅मुम्मका सुदर्शन यांनी आधीपासून कार्यक्षमता बघून जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची ठाणेदाराची नियुक्ती केली आहे.
त्यांच्या या निर्णयाने काही अधिकाऱ्यांची गोची ही झाली.
काही पोलीस निरीक्षकांनी राजकारणी लोकांना हाताशी घेऊन दबाव पण दिला मात्र पोलीस अधीक्षकांनी कुठलीही भीक न घालता पोलीस विभागात हस्तक्षेप न करण्याच्या सूचनाही त्या राजकारण्यांना दिला.
उत्तम पोलीस अधिकारी म्हणून जिल्ह्याला त्यांचा दरारा आहे.

मात्र एकटा कॅप्टन काय करणार हा प्रश्न पण त्यांच्या समोर भरकट फिरत आहे. तरीही जिद्द आणि चिकाटी ने जिल्ह्यातील सर्व पोलिसिंग विभागाशी ते स्वतः नजर ठेऊन कार्यप्रणाली ला पारदर्शक पद्धतीने हाताळणाच्या प्रयत्न करत आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!