चंद्रपूर (31 ऑक्टोबर )
- ✨✨सुशांत घाटे ✨✨✨
- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी साठी चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षातील उमेदवारांच्या तिकीट वाटपावरून कमालीचा नाराजीचा सुर पक्षा अंतर्गत पाहायला मिळत आहे. राजुरा, चंद्रपूर, आणि वरोरा- भद्रावती येथे काँग्रेस आणि भाजप च्या कार्यकर्त्यात प्रचंड रोष उमेदवारी वरून पाहायला मिळत आहे.
🌟चंद्रपूर विधानसभा मध्ये अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना सुरवातीस कुठलाच पक्ष तिकीट देण्यास तैयार नव्हता? आणि तिकीट दिल्यास कडाडून विरोध होण्याच्या पवित्रात त्यांची काँग्रेस कडून झाडा झडती ही झाली. त्यामुळे ऐन वेळेवर मुंबई वारी राष्ट्रवादी शरद पवार गट तुतारी कडून करण्यास उत्सुक असलेले आमदार जोरगेवार यांना परतीच्या प्रवासाला लागावे लागले.
मात्र भाजप च्या एका गोटातून जोरगेवार यांना उमेदवारी देण्यासाठी दिल्लीत फील्डिंग लावण्यात आली. मात्र या गोष्टीची कणकण लागताच जोरगेवार यांच्या विरोधात असणारे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लागलीच आपल्या समर्थकासह दिल्ली गाठली आणि विरोध दर्शवला मात्र मार्ग काढावा यासाठी वरिष्ठ पातळीवरून त्या बदल्यात मुनगंटीवार यांच्या साठी आणि समर्थकासाठी राजुरा विधानसभा ची सेटिंग झाल्याची विश्वसनीय माहिती आहे. तरीही मात्र मुनगंटीवार यांना जोरगेवार नकोच ही “पांढऱ्या दगडा वरची काळी रेष” असल्याचे ही पक्षातील अंतर्गत गटात बोलले जातं आहे.
✨फक्त पक्ष आदेश असल्याने प्रोटोकाल नुसार मुनगंटीवार हे जोरगेवार यांच्या पक्ष प्रवेश चे कार्यभार पाहून मोकळे झाले आहे.
मात्र भाजप च्या ऍक्शन Bप्लॅन चा मोठा अटॅम बॉम्ब म्हणून ब्रिजभूषण पाझारे हे अपक्ष म्हणून लढत आहे.🧭मुनगंटीवार यांचे कट्टर समर्थक आणि जीवाचे रान करणारे बिरजू म्हणून त्यांची ओळख आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या ब्रिजभूषण पाझारे यांना तिकीट न दिल्याने त्यांनी “नो मोअर सेट्टेलमेंट” ठोकत अब की बार बेडा पार चा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीच्या रण धुमाळीत काँग्रेस ची ही मोठी गोची झाली आहे.अनेक दिग्गजानी चंद्रपूर विधानसभा साठी तैयारी केली होती. कार्यकर्त्याची बांधणी पासून ते ग्राउंड रूट वर आखनी केली होती पण या ठिकाणी राजकारणाचा बळी झाल्याचे पाहायला मिळाले नेत्यांच्या आपसी संघर्ष मध्ये ही सीट गमवाण्याचे चिन्ह सध्या दिसू लागले आहे. विजय वड्डेटीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्या कलहा मध्ये राजकारण नाही तर त्रुटीकारण झाले आहे. काँग्रेस च्या राजू झोडे नी पाजारे सारखे बंड थोपटले असून त्यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. मुख्य म्हणजे ही निवडणूक चंद्रपूर विधानसभा साठी चौफेर गाजणार आहे.
🌟जि-धर दम उधर हम करीत भाजप -काँग्रेस चे कार्यकर्ते विभाजीत झाले आहे. अपक्षाचा ही जोर वाढू लागला आहे जोरगेवार यांना रोखण्यासाठी भाजपा ची बी टीम ऍक्टिव्ह झाली आहे? बिरजू की झोडे अशे ऑप्शन सध्या विधानसभा मध्ये गाजत असताना चार तारखे नंतर पूर्ण चित्र साफ दिसेल!
⭐⭐⭐⭐
👉राजुरा विधानसभा मतदार संघात दोन माजी आमदार आणि पदाधिकारी यांनी आयात उमेदवार देवराव भोंगळे यांना तिकीट दिल्यावरून जोरदार गदारोळ घातला आहे. भाजप च्या डाव पेचीत विधानसभा मतदार संघातील नेत्यांनी अपक्ष उमेदवारी भरत या उमेदवाराला विरोध दर्शवाला आहे. मुख्य म्हणजे याही ठिकाणी कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या भावना बाजूला सारून वरिष्ट नेत्यांच्या समर्थकाला दिल्याने प्रचंड विरोध उफाळून येत आहे. काँग्रेस चे विद्यमान आमदार सुभाष धोटे हे या लढतीत असून शेतकरी संघटन चे वामनराव चटप सुद्धा आमदार की साठी टॉप वर आहे. सध्या ते प्रथम क्रमांक वरती प्रचार मध्ये आहे. सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे हे सुद्धा या रिंगणात असून ग्रामीण भागात त्यांनी चांगलीच आपली सामाजिक प्रतिमा निर्माण केली आहे. ते या निवडणुकीत गेम चेंजर म्हणून दिसेल हे नक्की!
🧨🧨🧨🧨
वरोरा विधानसभा क्षेत्रात काँग्रेस मध्ये च अंतर्गत वाद चव्हाट्याला गेला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या बंधूना काँग्रेस पक्षातील तिकीट वरून अंतर्गत कलह पक्षामध्ये सुरु आहे. दिवगंत खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचे मोठे बंधू अनिल धानोरकर यांनी वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी भरली आहे. त्यामुळे भाजप – वंचित – अपक्ष असा सामना या ठिकाणी रंगणार आहे.
अपक्ष उमेदवार डॉ. चेतन खुटेमाटे हे ही ह्या स्पर्धेत आघाडीवर आहे. शिवसेना चे मुकेश जिवतोडे हे ही आपली पूर्ण ताकत लावत आहे. राजकारणात बळी पडलेले व दुरण हात दाखवणारे रवींद्र उर्फ गोलू शिंदे हे निवडणुकी पासून दूर सारले आहे. सुरवातीस मोठ्या गाजावाजाने निवडणूक लढवू अशे धोरण आणि नंतर तोरण पकडणारे शिंदे एकदम शांत का झाले? याचे सध्यातरी उत्तर मिळेनासे झाले मात्र जिल्हा सहकारी बँकेत तील भरतीत कुठून विरोध नको यासाठी त्यांची ही खेळी असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
या तिन्ही ही विधानसभा क्षेत्रात गेम चेंजर मोड म्हणजे अपक्ष ठरणार आहे…..
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

