चंद्रपूर -11 एप्रिल 2025
जिल्हा परिषद चा लाचखोर कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे आणि त्याच्या दोन साथीदाराला दोन दिवसांचा PCR न्यायालयाने दिला आहे. चार लाख वीस हजार रुपयाची लाच घेताना या क्लास वन अधिकाऱ्याला त्याच्या घरीच ACB चंद्रपूर पथकाने काल रात्री 11:30 वाजताच्या सुमारास बेड्या ठोकल्या.
स्वतःला अतिहुशार आणि लाचेच्या शिवाय कामाला हाथ न लावणाऱ्या या हाताला ACB ने चांगलेच दबोचत त्याच्या घरून भ्रष्टाचाराच्या कुंडलीतली आठ लाखाची नगदी रक्कम आलमारीतून घर झडतीत जब्त केली आहे.
दोन दिवसाच्या PCR मध्ये या अधिकाऱ्यांच्या आणखी मालमत्ते संदर्भात ACB चे पथक कारवाई साठी रवाना होणार असल्याचे विश्वसनीय वृत्त हाती आले आहे.
कमिशन भेटल्या शिवाय काम न करणाऱ्या या अधिकाऱ्यांचा तोरा आता म्या म्या करू लागला आहे.
ACB च्या पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या धडाकेबाज कारवाई ने भ्रष्टाचाराचे रावण सध्या भीतीने ठपकून बसले आहे.
जर तुम्हाला कोणी लाच मागत असेल तर तात्काळ चंद्रपूर ACB ला तक्रार करा!
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

