चंद्रपूर जिल्ह्यातील वादग्रस्त, मगरूर आणि आर्थिक हितासाठी कुठल्याही घटकेला जाणाऱ्या, तत्कालीन कोरपण्याचा ठाणेदार वर्धा जिल्ह्यात निलंबित….
मुंबई /वर्धा / चंद्रपूर –
18 मार्च 2025
(सुशांत घाटे)
⭐चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस विभागातील वादग्रस्त, मगरूर व आर्थिक हितासाठी कुठल्याही घटकेला जाणारा तत्कालीन कोरपण्याचा ठाणेदार सदाशिव ढाकणे वर्धा जिल्ह्यातील खरगांणा पोलीस स्टेशन ला ठाणेदाराची जवाबदारी सांभाळताना कर्तव्यात कसुरी च्या चुकीने तात्काळ निलंबित करण्यात आला आहे.
चक्क अर्थसंकल्प अधीवेशनात आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार सुमित वानखेडे यांनी वर्धा जिल्ह्यातील पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढत खरागांना ठाणेदाराची वरात च काढली आहे.विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुद्धा या बाबत कमालीची नाराजी व्यक्त केली आहे.
वनविभागाने जंगलात आग लावण्याच्या आरोपाखाली बोरगाव गोंडी येथील शेतकऱ्याला अमानुष मारहाण केली.
कोरती नावाच्या शेतकऱ्याने या बाबत पोलीस स्टेशन ला जाऊन तक्रार दिली मात्र पोलिसांनी फिर्यादीलाच योग्य वागणूक न देता त्याला उलट सुनावले, शेतकऱ्याचा मुलगा देशसेवेत सैनिक असल्याने त्याने याची घटना आपल्या अधिकाऱ्यांना सांगितली त्याची दखल घेत वर्धा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांना या बाबतची माहिती देण्यात आल्या वर गुन्हा नोंदवण्यात आला.
मात्र अप्रत्यक्ष रीत्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मदत करणे चांगलेच या ठाणेदाराला भोवले आहे.
⭐एका महीला प्रकरणात कोरपणा ठाण्यात ही तक्रार दाखल न करता लाखो गबन?
कोरपण्याचे तत्कालीन ठाणेदार राहलेल्या सदाशिव ढाकणे यांना मूळ बदली होण्याच्या आधीच ठाणेदार पदाचा त्याच्याकडून पदभार काढत 23जानेवारी2023 रोजी तत्कालीन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशीं यांनी ठाणेदार पदावरून पायउतार केले होते.
कोरपण्यातील पोलीस स्टेशन हद्धीत एका जिनिंग मध्ये एका महिलेसोबत विनयभंगाचा प्रकार घडला होता, ती महीला पोलीस स्टेशन कोरपना येथे तक्रारी साठी आली असता त्याचा निपटारा या वादग्रस्त ठाणेदाराने तीन लाखाच्या ऐवज मध्ये केल्याचा गंभीर प्रकार तत्कालीन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशीं यांच्या कानावर जाताच त्यांनी याची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या कडे दिली होती.
त्यावेळेस पोलीस भर्ती सुरु असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक ढाकणे हे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह यांना भेटायला आले असता परदेशीं यांनी कडक शब्दात ढाकणे ला फटकारले व पोलीस स्टेशन ची पायरी सुद्धा न चढण्याची ताकीद दिली होती. त्यावेळेस पोलीस दलातील अनेक अधिकारी ही त्यावेळेस या घटने दरम्यान उपस्थित होते.
⭐पंजाब प्रांतातील ते जिनिंग ऑपेरेटर युवक ठाणेदार यांच्या विशेष कृपेनें बाइज्जत बरी झाले जिच्या सोबत अत्याचार झाला तिलाही आर्थिक मोबदला देऊन गुपचूप केले आणि तिला मध्यप्रदेश मध्ये आपल्या राज्यात पाठवून दिले.
नंतर ती चौकशी थंडबस्त्यात पडली मात्र खरे काय ते पूर्ण पोलीस अधीक्षक परदेशीं यांच्या कानावर गेले.आणि अशा वादग्रस्त, मगरूर ठाणेदाराची त्यानंतर वर्धा जिल्हायात बदली झाली.मात्र ठाणेदाराची ही भ्रष्ट कार्यप्रणाली चंद्रपूर पोलीस विभागाला काळीमा फासून गेल्याने मोठी गोची झाली. पण तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी नायक यांनी त्याचा अहवाल पोलीस अधीक्षक परदेशीं यांना पाठवून दिला होता.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.


