Wednesday, August 26, 2026
HomeBreaking NewsHIGHWAY ची वसुली डायरी! खैरकार साहेब आणि मनोज ची वसुली बल्ले बल्ले...

HIGHWAY ची वसुली डायरी! खैरकार साहेब आणि मनोज ची वसुली बल्ले बल्ले…

करोडो रुपयाची टॅप इन्चार्ज ची आतापर्यंत बल्लेबाजी, मनोज ची हफ्तेवारी? अपघात होतॊ मात्र महामार्ग पोलीस नदारद…

नागपूर / चंद्रपूर-16 मार्च 2025

(सुशांत घाटे )

नागपूर – चंद्रपूर महामार्गा वर नुकताच एक भीषण अपघात घडला या अपघातामध्ये रोड वर उभ्या असणाऱ्या,   ट्रक ला रात्री एसटी ने धडक दिली. यावेळेस एस टी तील कंडक्टर(वाहक )चा जागीच मृत्यू झाला तर अन्य 13 प्रवासी जखमी झाले. आदल्या दिवशी सुद्धा याच महामार्गा वर बल्कर ट्रक उलटला होता त्यामुळे तब्बल तीन तास वाहतूक विस्कळीत झाली होती.

मात्र महामार्गवर असणारी हायवे ट्रॅफिक या दोन्ही अपघाता पासून नदारद होती.

वाहतूक व्यवस्थेला सुचारू पद्धतीने हाथाळण्याची आणि अपघात स्थळी मदत देण्याची जवाबदारी ज्या खांद्यावर आहे ते मात्र वसुली आणि भ्रष्टाचाराच्या आहारी मधुमक्खी च्या पोळी च्या “सहद” चाटण्यात मल्लिन झाले आहे!महामार्गांवर अपघात घडल्यास तात्काळ मदत कारण्याचे उद्धिष्ठ असताना हे आरामदायक जीवन पद्धतीने मॉर्निंग ब्रेकफास्ट करण्या पासून ते डिनर पर्यंत स्वयंमचलित वसुली फंड्यात गुंतले आहे!

जिल्ह्यातील वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असताना,यांचा  उद्देश त्यांच्याकडून वसुली करण्याचा असून महिन्याकाठी लाखोचा भ्रष्टाचार जिल्हा महामार्ग पोलिसांकडून करण्यात येत आहे?

महामार्ग पोलिसांचे रेटकार्ड आणि डायरी?

ट्रान्सपोर्ट वाहतूक, ट्रॅव्हल्स, रेती चे ट्रॅक्टर यांच्याकडून दरमहा यांचा रेट कार्ड ठरवून घेतला गेला आहे.
महिन्याकाठी जवळपास या टॅप कढून 7 ते 8 लाख रुपयाचे हफ्तेखोरी करण्यात येत आहे?

महिना ठरलेले अनेक ट्रान्सपोर्ट कडे जिल्हा महामार्गतला मनोज हा वसुली चा कलेक्शन करतो!
जिल्हायातील होणारी राज्य- आंतर राज्य वाहतुकीतुन जाणाऱ्या बाहेरील ट्रकांना एन्ट्री च्या नावाखाली एक चिट्टी दिली जाते या चिट्टी चा अर्थ म्हणजे या विभागाची 500 रुपयात दिलेली महामार्ग सूट!

चंद्रपूर नागपूर महामार्ग वर असणाऱ्या टॅप चा जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात वसुली फंडा चा दोन एपिसोड (भाग ) मध्ये डेली पोस्ट मार्टम नी होणाऱ्या लूटमारीचे वृत्त प्रकाशित केले होते.

दिवसाला टार्गेट घेऊन कोणत्याही महामार्गाला आडोसा घेऊन या टॅप कढून दिवस भर वसुली करून त्यातील 50% रक्कम आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला देऊन क्लास वन काम करत आहे!

.    ⭐    ….टॅप चा इन्चार्ज आणि वसुलीकर्मी ची रोचक !

गेल्या तीन वर्षांपासून चा ही अधिक वेळ होऊन एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या महामार्ग वाहतूक सेवेत कार्यरत असणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र खैरकार यांची चांगलीच बल्ले बल्ले झाली आहे!

 तीन वर्षांपासून करोडो रुपयाची भ्रष्टाचाराची माया यांनी  राज्य महामार्ग वाहतूक व्यवस्थेच्या वसुली फंड्यातुन गोळा केली आहे. यांची बदली न होण्याचे ही कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. चंद्रपूर जिल्हा पोलीस दलात तळोधी येथे ते यापूर्वी ठाणेदार होते त्या वेळेस चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे हे होते. पोलीस अधीक्षक साळवे सध्या या च महामार्गाला कार्यान्वित आहे हे विशेष!

🌟 वसुली साठी मनोज पिदूरकर ची नियुक्ती?

जिल्ह्यातील वसुलीची जवाबदारी महामार्ग पोलिसातील मनोज पिदूरकर कडे असल्याची विश्वसनीय माहिती आहे? जिल्ह्यातील सर्व ट्रान्सपोर्ट धारकांकडून मनोज 7-8 लाख रुपयाची महिन्याकाठी वसुली करत आपल्या टॅप इन्चार्ज गोळा करून देतो!
महिना भरला की मनोज एक ते दहा तारखे पर्यंत वसुलीत व्यस्त असतो!त्यामुळे मनोज ला पूर्णतः कामासाठी सूट दिल्या गेली आहे.

⚛️⚛️⚛️मनोजला ACB तुन ही काम करून भ्रष्टाचाराची लागण?

लाचखोरांवर जो विभाग कारवाई करतो अश्या ACB(लाचलूचपत प्रतिबंधक विभाग )तुनच काम करून आलेल्या मनोज पिदूरकर ला भ्रष्टाचाराची लागण कशी लागली? हा मुद्दा समजण्या पलीकडे आहे.
ज्या ACB मध्ये मनोज ने अनेक लाचखोरांना अटकेत पाहले तोच मनोज आज भ्रष्टाचाराला चालना देत वसुलीचा मास्टर झाला आहे?

🌟नॉन कर्ररप्ट IPS डॉ. छेरिंग दोरजे
महामार्ग चार्ज वर…

IPS तुकडीतले डॉ. छेरिंग दोरजे म्हणजे पोलीस विभागातील उत्तम प्रशासकीय अधिकारी, भ्रष्टाचाराला कुठेही खत पाणी न घालणाऱ्या या अधिकाऱ्याची एक वेगळीच ओळख. नॉन करूप्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोरजे यांचा विशेष दरारा महाराष्ट्र पोलीस खात्यात आतापर्यंत पाहायला मिळाला आहे.
गोंदिया {SP ), चंद्रपूर (SP)मुंबई (DCP), अंधेरी (DCP), नागपूर रेंज (IGP), महाराष्ट्र,कायदा सुव्यवस्था (IG) असा त्यांच्या कालखंडात त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे.आणि तूर्तास राज्य महामार्ग चा ही चार्ज सध्या त्यांच्याकडे असल्याने अशा भ्रष्टाखोर यंत्रनेला ते कशे हाथाळणार हे येणारी वेळच सांगेल!

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!