Thursday, April 16, 2026
HomeBreaking Newsहत्या, पाठलाग.. आणि पोलिसांच्या मध्यरात्री अचूक कारवाईत आरोपीना बेड्या!

हत्या, पाठलाग.. आणि पोलिसांच्या मध्यरात्री अचूक कारवाईत आरोपीना बेड्या!

चंद्रपूर – 22 मार्च2025

राजुरा तालुक्यातील भरदीवसा सास्ती येथे थरकाप उडवणाऱ्या खुनाच्या गुन्हात राजुरा पोलिसांनी 24 तासाच्या आत आरोपीना बेड्या ठोकल्या आहे.
व्यंकटेश मोतकु या 28 वर्षीय युवकांची लोखंडी रॉडणे पाठलाग करीत जुन्या वादातुन हत्या करण्यात आली होती.

राजुरा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे विविध पथक आरोपीच्या शोध मोहिमेत असताना राजुरा मध्येच लपून बसलेल्या अंकित दुप्मला, श्रावण दुम्पला व अमन केसकर या तिगांनाही राजुरा पोलिसाच्या गुन्हे शाखेने मोठ्या शिताफिने अटक केली आहे.
घटने नंतर च स्थानिक गुन्हे शाखेच्या विविध पथकाने रेल्वे स्टेशन बल्लारपूर, बस स्थानक, आणि जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या सर्व महा मार्गांवर आरोपीना पकडण्यासाठी जोरदार फील्डिंग लावली होती. लोकेशन घेत असताना हे आरोपी दडी मारून राजुऱ्यातलपून बसल्याची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी त्यांची घेराबंदी करीत 24 तासाच्या आत आरोपीना अटक केली आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!