चार वर्षात 100 कोटी चा भ्रष्टाचार… नियम ढाब्यावर…दारूचे परवाने बहाल
चंद्रपूर 14 मार्च 2025
सुशांत घाटेचंद्रपूर जिल्ह्यात दारू च्या परवण्यासाठी कायद्याला च ढाब्यावर बसवत राज्य उत्पादन शुल्क च्या विभागाने 100 कोटी चा चार वर्षात भ्रष्टाचार करत, फुटाणे सारखे लायसन्स बहाल केले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
नुकताच चंद्रपूर पोलिसांनी एका कारवाई दरम्यान चंद्रपूर शहरातील पिंक पॅराडाईज रेस्टॉरंट अँड बार ला सील ठोकले आहे.
कायद्याचे डोज देत त्याला आता नियम घेऊनच उघडण्याचा सल्ला पोलीस विभागाने दिला आहे.
याच बार जवळ एका पोलीस कर्मचारी ची हत्या झाल्यानंतर चंद्रपूर पोलीस विभाग आता जिल्ह्यातील इतरही दारूच्या परवण्यावर कायद्यात आहे की नाही त्याचा आढावा घेत आहे.
खरेतर हे काम राज्य उत्पादन शुल्क विभागाचे असताना (एक्ससाईझ)मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत नियमांना तिरांजली देत जागोजागी दारूचे अड्डे देऊन मोकळे झाले आहे. आणि त्याची डोखेदुखी कायद्याने पोलीस विभागाला देऊन गेली आहे.
मंदीर, मस्जिद, गुरुद्वारा, शाळा, कॉलेज, मुलीचे शासकीय मागासवर्गीय वसतिगृह आजूबाजूला असताना सुद्धा, त्याला ही कलाटणी देत दारूच्या परवण्यावर शिक्कामोर्तब राज्य उत्पादन शुल्क विभागाने करत बॉटल उभ्या केल्या आहे.
कित्येक परमिट रूम ला तर पार्किंगच दिसत नाही, म्हणजे नसताना सुद्धा बियर शॉपी आणि परमिट रूम आर्थिक देवाण घेवाणतुन लायसन्स देण्यात आले आहे.
दारूबंदी हटल्या नंतर कंट्रोल च्या दुकानात राशन सारखे एक्ससाईझ विभागाने दरपत्रक लावत दारूचे परवाने वाटले आहे.
ज्याने दिले त्याचे दरपत्रक रेट नुसार फास्ट ट्रॅक सारखे लायसन्स वितरित करण्यात आले. आणि ज्याने नाही दिले त्याच्या फायलीला धूळ खात ठेव्हले चा ही प्रकार चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क विभागात झाला आहे.
ज्याच्या हातात काम आले त्याने बहती गंगा सारखे लाखो रुपयाची लाच घेत धुवून घेतले!🛞…..लाचखोर ही अटकेत!
भ्रष्टाचाराच्या या लाटेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचा लाचखोर अधीक्षक संजय पाटील आणि त्याचे दोन अधिकारी सुद्धा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लाच घेताना वर्ष भरापूर्वी पकडल्या गेले होते.
इतके होऊन सुद्धा आज ही राजरोसपने राज्य उत्पादन शुल्क विभागातील काही अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार आज ही दरमहीन्याला वसुली तुन लाखोचा डल्ला मारत च आहे.
वसुलीसाठी दाही दिशा ठरवत मोठ्या प्रमाणात हफ्ता वसुलीचे एक्ससाईझ निदर्शनास येत आहे.
जवळपास 400 च्या वर परमिट रूम, बियर शॉपी ह्या नियमात तच बसत नाही, फक्त कागदोपत्री च त्यांचे शिक्के आहे मात्र अस्तिवात नाही.⚽…मी खपवून घेणार नाही –
अशोक उइके,![]()
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उइके यांनी सुद्धा या विषयाला गंभीर घेत शासनाच्या नियमाला तिरांजली देणाऱ्या सरसकट परमिट रूम, बियर शॉपी, वाईन शॉप, देशी दारू चे दुकानें यांच्यावर कारवाई करण्याचे सूचना दिल्या जाईल असल्याच डेली पोस्ट मार्टम ला स्पष्ट केले आहे.
कुठल्याही प्रकारे खपवून घेतले जाणार नसल्याचं सुद्धा त्यांनी जाहीर केल आहे. पारदर्शक पद्धतीने सर्व हाथळण्याच्या आणि जे नियमाच्या निकषात नाही त्यावर पोलीस अधीक्षक यांनाही या संदर्भात कारवाई च्या सूचना देण्यात येणार असल्याच सांगितलं आहे.
🌟🌟पोलीस अधीक्षक सुद्धा चालवणार कायद्याचे दांडूक….
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्पष्ट केल आहे की कायद्या चा बडगा उभारला जाईल!
नियमाप्रमाणे न केल्यास त्याला कायद्याचा दांडूक दाखवल्या जाईल पिंक पॅराडाईज बार ला सील ठोकल्या नंतर चंद्रपूर पोलीस विभाग शहर आणि जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्या करीता कुठेही तंटा, वाद विवाद होऊ नये यासाठी तत्परतेने निपटण्यास तैयार आहे.
पिंक पॅराडाईज सारखे कायद्याला मोडणाऱ्या अनेक बार आणि बियर शॉपी ची सूची तैयार करत त्यांनाही सील ठोकण्याचा इशारा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिला आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

