महीला सरपंच आणि ग्रामसेवक अटकेत!
चंद्रपूर -6 मार्च
लाचखोरीचे प्रमाण इतके वाढले आहे की कुठली भीती सुद्धा या भ्रष्टाचारांना राहली नाही. पूर्वी स्वखुशीने कुणी कामाच्या मोबदल्यात चाय पाणी पाजत असे पण आता थेट देता की जाता असा भ्रष्टाचाऱ्यांचा नारा झाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील अजयपूर येथे फेरफार करण्यासाठी ना हरकत प्रमाण पत्राची रीतसर कागदपत्रे दिली असता त्या कागदपत्राला केराची टोपली दाखवत आधी लाच द्या करणाऱ्या ग्रामसेवक आणि महिला सरपंचला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
कुक्कट पालनाच्या व्यवसाया करीता ना हरकत प्रमाणपत्र ची आवश्यकता फिर्यादीस होती पण त्याला त्या मोबदलयात दहा – दहा हजार रुपयाची मागणी करण्यात आली. तडजोडी अंती अजयपूर येथील ग्रामसेवक विकास तेलमासरे यांनी 5000 मागितले व महिला सरपंच श्रीमती नलिनी तलांडे नी 10000 ची मागणी घातली. दरम्यान आज ट्रॅप लावत ACB च्या पथकाने चंद्रपूर पंचायत समिती च्या मुख्य प्रवेश द्वारा जवळ 5000 लाच घेताना आरोपीस अटक केली आहे. तसेच महिला सरपंचलाही ताब्यात घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील भ्रष्टाचाराला चांगलाच दणका आतापर्यंत ACB नी लावला आहे.सदरची कारवाई डॉ. दिगंबर प्रधान,पोलीस अधीक्षक (ACB )यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती मंजुषा भोसले, पोलीस उपअधीक्षक, जितेंद्र गुरनुले यांच्या पथकाने केली आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

