Saturday, June 6, 2026
HomeBreaking Newsजिल्ह्यात बदलीचे आदेश पारित; एसपी नुरूल हसन यांची मोठी प्रशासकीय सर्जिकल स्ट्राईक

जिल्ह्यात बदलीचे आदेश पारित; एसपी नुरूल हसन यांची मोठी प्रशासकीय सर्जिकल स्ट्राईक

भंडारा जिल्ह्यात बदलीचे आदेश पारित; एसपी नुरूल हसन यांची मोठी प्रशासकीय सर्जिकल स्ट्राईक!

भंडारा | सुशांत घाटे 
भंडारा जिल्हा पोलीस दलात मोठे प्रशासकीय फेरबदल करत पोलीस अधीक्षक नुरूल हसन (भा.पो.से.) यांनी तब्बल ३० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पारित केले आहेत. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासोबतच पोलीस यंत्रणेला अधिक गतिमान आणि परिणामकारक बनविण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.

महाराष्ट्रातील शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष आणि धाडसी आयपीएस अधिकारी म्हणून ओळख असलेले एसपी नुरूल हसन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भंडारा जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेत कार्यक्षमतेवर भर दिला आहे. वैनगंगा नदीपात्रातील अवैध वाळू उपशावर कठोर कारवाई करून त्यांनी आधीच अवैध धंदे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला स्पष्ट संदेश दिला आहे. यवतमाळ आणि नागपूरनंतर भंडारा जिल्ह्याची धुरा सांभाळताना त्यांनी “कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही” ही भूमिका सातत्याने अधोरेखित केली आहे.

या बदल्यांमध्ये अनेक पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय तसेच विनंतीवरून बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे, नियंत्रण कक्ष, वाहतूक शाखा, आर्थिक गुन्हे शाखा आणि इतर महत्त्वाच्या विभागांमध्ये नव्याने जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.

👉पोलीस निरीक्षक संदीप एकाडे यांच्या पोस्टिंगकडे राज्याचे लक्ष!

या सर्व बदल्यांमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे तो म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील वादग्रस्त ठाणेदार म्हणून चर्चेत राहिलेले पोलीस निरीक्षक संदीप एकाडे यांचे भंडारा जिल्ह्यात आगमन.
चंद्रपूर जिल्ह्यातील त्यांच्या कार्यकाळात अनेक वाद, आरोप-प्रत्यारोप आणि चर्चांमुळे ते सतत चर्चेत राहिले होते. आता त्यांना भंडारा जिल्ह्यात पाचारण करण्यात आल्याने पोलीस वर्तुळासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचेही लक्ष त्यांच्या पुढील पोस्टिंगकडे लागले आहे.
भंडाऱ्यात त्यांना नेमकी कोणती जबाबदारी दिली जाणार? कोणत्या पोलीस ठाण्याची धुरा त्यांच्या हाती दिली जाणार? याबाबत सध्या विविध स्तरांवर चर्चा रंगू लागली आहे. जिल्ह्यातील संवेदनशील ठाणे, गुन्हे शाखा किंवा विशेष विभागांपैकी कोणत्या ठिकाणी त्यांची नियुक्ती होते, याकडे अनेकांचे विशेष लक्ष लागले आहे.

गुन्हेगारीविरोधात कठोर भूमिका
भंडारा हा जिल्हा आकाराने छोटा असला तरी राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यांपैकी एक म्हणून त्याची ओळख आहे. मध्य भारताशी जोडलेले भौगोलिक स्थान, खनिज व नदीसंपदा तसेच वाढती शहरीकरण प्रक्रिया लक्षात घेता कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्ह्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
एसपी नुरूल हसन यांनी यापूर्वीच्या कार्यकाळात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची क्षमता सिद्ध केली आहे. त्यामुळे या बदल्यांनंतर जिल्ह्यातील पोलीस दल अधिक जबाबदारीने आणि परिणामकारकपणे कार्य करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

👉पोलीस दलात नवा संदेश

या बदली आदेशांमधून एक स्पष्ट संदेश समोर येत आहे — “कामगिरी, शिस्त आणि जबाबदारी यालाच प्राधान्य.” प्रशासकीय कारणे, कार्यक्षमता आणि विभागीय गरजा लक्षात घेऊन करण्यात आलेल्या या फेरबदलांमुळे भंडारा जिल्हा पोलीस दलात नव्या कार्यसंस्कृतीची सुरुवात होणार असल्याचे बोलले जात आहे.
कायद्याचे बारा वाजवणाऱ्यांचे तेरा वाजविण्याची ख्याती असलेले एसपी नुरूल हसन यांनी पुन्हा एकदा आपल्या निर्णयक्षमतेची छाप उमटवली असून, आगामी काळात भंडारा जिल्ह्यात गुन्हेगारीविरोधी कारवायांचा वेग आणखी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
आता सर्वांच्या नजरा एका प्रश्नावर खिळल्या आहेत — भंडाऱ्यात आलेल्या संदीप एकाडे यांना नेमकी कोणती पोस्टिंग मिळणार? याचे उत्तर येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

बघा बदल्यांची यादी 👇

अधिकारी
सध्याचे नेमणूक ठिकाण
बदलीचे ठिकाण
सुभाष बारसे (पोनि)
गणेशपूर पो. स्टे. लाखनी
गणेशपूर पो. स्टे. तुमसर,

बालासाहेब आत्राम (पोनि)
स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा
द्यानी पोलीस निरीक्षक, पो. स्टे. तुमसर,

कृष्णकुमार हिवारे (पोनि)
प्रभारी अधिकारी अड्याळ, भंडारा
गणेशपूर पो. स्टे. पवनी,

जितेंद्र भिवगडे (पोनि)
नियंत्रण कक्ष, भंडारा
गणेशपूर पो. स्टे. लाखांदूर,

सचिन तावाडे (पोनि)
नियंत्रण कक्ष, भंडारा
गणेशपूर पो. स्टे. अड्याळ,

आकाश गणवीर (पोनि)
सुरक्षा शाखा, भंडारा
गणेशपूर पो. स्टे. लाखनी,

संजय गावंडे (पोनि)
गणेशपूर पो. स्टे. तुमसर
प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा,

सचिन पवार (पोनि)
गणेशपूर पो. स्टे. लाखांदूर
प्रभारी अधिकारी अड्याळ, भंडारा,

सतीश बनसोड (पोनि)
गणेशपूर पो. स्टे. पालांदूर
प्रभारी अधिकारी सावरबंद पो. स्टे., भंडारा,

जितेंद्र बोरकर (पोनि)
वाहतूक नियंत्रण शाखा
पोलीस निरीक्षक जिवती/विशेष शाखा (मजकूर अस्पष्ट),

सूरज राजन (पोनि)
नियंत्रण कक्ष, भंडारा
सहाय्यक पोलीस निरीक्षक, पो. स्टे. भंडारा,

सचिन जगनाडे (सपोनि)
वाचक कक्ष, भंडारा
गणेशपूर पो. स्टे. वरठी,

विकास मुंडे (सपोनि)
पो. स्टे. तुमसर, गणेशपूर पो. स्टे. पालांदूर,

प्रशांत साहरे (सपोनि)
पो. स्टे. कारधा
प्रभारी अधिकारी पोलिसाईड कक्ष, भंडारा,

धनंजय पाटील (सपोनि)
गणेशपूर पो. स्टे. अड्याळ
आर्थिक गुन्हे शाखा, भंडारा,

पियुष पिंपळकर (सपोनि)
आपोप शाखा सेल
प्रभारी अधिकारी सेल, भंडारा

गणेश राठोड (सपोनि)
नियंत्रण कक्ष
पो. स्टे. कारधा

प्रेम देवले (पोउपनि)
पो. स्टे. पवनी
पो. स्टे. तुमसर

गंगन बावणे (पोउपनि)
पो. स्टे. भंडारा
पो. स्टे. पवनी

प्रविण सयाम (पोउपनि)
पो. स्टे. तुमसर
स्थानिक गुन्हे शाखा

श्रीराम गावंडे (पोउपनि)
पो. स्टे. तुमसर
पो. स्टे. पवनी

प्रशांत बडुळे (पोउपनि)
पो. स्टे. साकोली
वाचक देव्हाडा, तुमसर

पुष्कलनाथ राठोड (पोउपनि)
पो. स्टे. तुमसर
वाचक उपविभाग, तुमसर

रजनी तुमसरे
पो. स्टे. भंडारा
नियंत्रण कक्ष, भंडारा

राजू चव्हडे
वाचक उपविभाग, पवनी
पो. स्टे. भंडारा

चंद्रलाल पाटले
पो. स्टे. सिहोरा
बदली विनंती अमान्य

धनश्याम नवघर
पो. स्टे. भंडारा
बदली विनंती अमान्य

विजय पंचबुद्धे
पो. स्टे. भंडारा
प्रभारी अधिकारी प्रतिबंधक कार्यवाही कक्ष

प्रमोद बक्कर
पो. स्टे. भंडारा
बदली विनंती अमान्य

विजयकुमार गुंडे
पोलीस कल्याण शाखा
वाहतूक नियंत्रण शाखा

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!