Wednesday, August 26, 2026
HomeBreaking Newsपोलीस अधीक्षक ते पोलीस निरीक्षक सर्वाना हवे हफ्ते? राज्य महामार्ग झाला लूटमारी...

पोलीस अधीक्षक ते पोलीस निरीक्षक सर्वाना हवे हफ्ते? राज्य महामार्ग झाला लूटमारी मार्ग…

पोलीस अधीक्षक ते पोलीस निरीक्षक सर्वाना हवे हफ्ते?

नागपूर – 06मार्च 2025
(सुशांत घाटे )

  • महामार्ग वाहतूक पोलिसांचा भ्रष्टाचाराचा नवीन चेहरा म्हणजे हायवे वर या आणि शासनाचा गलेलठ्ठ पगार घेत असताना, त्यांच्या मूळ व्याप्तीतून भटकत आपत्कालीन मदत करण्याचे व्यासपीठ सोडून जिल्ह्यातील हायवे वर वसुलीचा डल्ला मारण्याचा उपक्रम करत शासनाच्या तिजोरीला न देता स्वतःच्या खिशात टाकण्याचा भन्नाट उपक्रम 19 टॅप(महामार्ग पोलीस )मार्फत राज्य महामार्ग पोलीस विदर्भातील वाहतूक पोलिसांनी उभारल्याचा मोठा लाचखोर डाव प्रत्यक्ष रित्या घडत असल्याचे समोर येत आहे!

⭐मोठी रसद मोठा अधिकारी….
विदर्भातील 11 जिल्ह्यातील राज्य महामार्ग वाहतूक पोलिसांचे कर्तव्य सध्या स्वतःच्या अधीपालानांचे आर्थिक धोरण आणि निकष पहले करत राज्य सरकार च्या यंत्रनेला मोठा तडा देत स्वतःच्या घशात गलेलठ्ठ पगार घेत दांडी देत आहे!

चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा नागपूर, अमरावती ते बुलढाणा पर्यंत राज्य महामार्ग वाहतूक पोलिसांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला असताना त्याची व्याप्ती हफ्ते खोरीत करत यासाठी पोलीस अधीक्षक ते पोलीस निरीक्षक पर्यंत आर्थिक रसद पुरवून त्याला मार्ग बनवला असल्याचे चित्र पांढऱ्या बगळ्या मार्फत अंगाला शहारे देत आहे?

काय आहे प्रकार….
विदर्भात 19 टॅप सध्या च्या घडामोडीला कार्यरत आहे प्रत्येक टॅप ला टार्गेट दिले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास 34 संख्याबळ असणाऱ्या कर्मचाऱ्यां सोबतच एक पी. एस. आय (PSI )आणि एक ए. पी. आय (API )चा वर्ग जिल्ह्यातील हायवे ला आपरेट करतो.

यांची मुख्य कार्य प्रणाली ही जिल्ह्यातील हायवे ला आपत्कालीन व्यवस्थेला सोडून फक्त आर्थिक भंडार कसा मिळेल त्याचे शोध घेतो? जसे जिल्ह्यात तेलाचे साठे आहे की काय यां प्रकारे,त्यासाठी लक्कडकोट सीमा, मुल रोड, कंपा टेम्पा, खंबाडा रोड यासाठी विशेष(आर्थिक )दररोज ची बोली लावत टॅप इन्चार्ज ला 50% टक्के आर्थिक भ्रष्टाचारातून वसुली करत डाव सारण्याचा मोठा प्रकार यां ठिकाणी घडत आहे?

⭐⭐⭐चक्रोल लागेबांधे……
पांढऱ्या बगळ्यांनी यासाठी त्याचे लागे बंदेही लावले आहे.चक्रोल करीत जिल्ह्यातील महामार्ग वरून होणारी वाहतूक मध्ये आंध्रप्रदेश, तेलंगणा, आणि इतर अनेक जिल्ह्यातील जाणाऱ्या ट्रक कडून कार्ड देत महिन्या काठी लाखो रुपयाची वसुली निर्धार शासनाच्या तिजोरीला बगल देत या हफ्ते खोरांनी आपल्या व्यासपीठातून मांडला आहे?

या साठी अकरा जिल्हायातील जो मुख्य प्रवाहात असणाऱ्या पोलीस अधीक्षकालाही महिन्याकाठी 70 हजाराची रसद पुरवल्या जात आहे? त्या सोबतच अन्य अधिकाऱ्यालाही त्याची मूळ रक्कम भ्रष्टाचार करून पुरवून मनोज ची सेना टॅप रेकॉर्ड करत आहे!
वर्धा -यवतमाळ चा अध्याय पासून ते विदर्भातील सर्व यंत्रनेचे भाकीत 15 लाखाचे मोठ्या यंत्रणातील सुशोभीत अधिकाऱ्यांना पांढरे बगळे शासनाच्या उपक्रमाला समोर ठेवून डल्ला मारत भ्रष्टाचाराचा खेळ मांडून बसले आहे?
हेल्मेट, ड्रायविंग, ओव्हर स्पीडिंग करीत सामान्य नागरिकांची कोणत्या न कोणत्या कारणास्तव लूटमार करणाऱ्या या थव्याने जाणाऱ्या लूटमार यंत्रनेला काबीज करण्याचे धाडस लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला करण्याची गरज निर्माण झाली आहे.

चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन चे आदेश…

चंद्रपूर चे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी आज जिल्ह्यातील सर्व पोलीस निरीक्षक आणि वाहतूक पोलीस निरीक्षकांना कडाडीचे आदेश दिले आहे. जिल्ह्यात विद्यार्थ्यांचे पेपर सत्र सुरु आहे.कुठल्या विध्यार्थाना त्रास होईल असे कृत्य न करण्याचे आदेश दिले आहे. तक्रारी आल्यास थेट त्याची दखल घेऊन निलंबित करण्यात येईल असेही त्यांनी वीसी दरम्यान आज सुनावले आहे. त्याच्याकडेही अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यांनी याबाबत दखल घेतली आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!