Saturday, June 6, 2026
HomeBreaking Newsचंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी वर गृह खाते गंभीर? वरिष्ठ अधिकाऱ्यां सोबत दोन...

चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी वर गृह खाते गंभीर? वरिष्ठ अधिकाऱ्यां सोबत दोन अधिकाऱ्यांची होणार उचलबांगडी! वरिष्ठ पातळी वरून हालचालीना वेग?

मुंबई / चंद्रपूर
16 ऑगस्ट (सुशांत घाटे )

💥चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी च्या संदर्भात लवकरच पोलीस विभागातील अधिकाऱ्यां संदर्भात मोठी दखल घेतल्या जाण्याची विश्वसनीय माहिती सूत्रा द्वारे डेली पोस्ट मार्टम ला मिळाली आहे.

👉सतत झालेल्या फायरिंग आणि हत्ये च्या घटना क्रमाने चंद्रपूर जिल्हा हादरून गेला आहे. जिल्ह्यातील दोन ते तीन वरिष्ठ -कनिष्ठ अधिकाऱ्यांना बदलण्यात येणार असल्याची  सूत्रांनी माहिती दिली आहे?

👉धडाकेबाज पोलीस अधिकाऱ्यांची लवकरच चंद्रपूर जिल्ह्यात वर्णी लागणार असल्याची मोठी गोपनीय माहिती आली आहे? महाराष्ट्र गृह विभाग तथा राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकऱ्यांनी चंद्रपूरातील ज्वलंत गुन्हेगारी ला चाप बसवण्या करीता मोठे पाऊल उचलण्याचे संकेत दिलेले आहे.

पोलीस विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्या ला ही या ठिकाणाहून बदलण्यात येणार असल्याचे सूत्राने माहिती दिली आहे.

 

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!