Tuesday, August 25, 2026
HomeBreaking Newsनागपूर ग्रामीण पोलिसांची 'किमया' लय भारी! गुन्हेगारी नियंत्रणाऐवजी 'वसुली'चे नवे विक्रम; पोलीस...

नागपूर ग्रामीण पोलिसांची ‘किमया’ लय भारी! गुन्हेगारी नियंत्रणाऐवजी ‘वसुली’चे नवे विक्रम; पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार मूकप्रेक्षक?

नागपूर ग्रामीण पोलिसांची ‘किमया’ लय भारी! गुन्हेगारी नियंत्रणाऐवजी ‘वसुली’चे नवे विक्रम; पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार मूकप्रेक्षक?

नागपूर:

कायद्याचे राज्य आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याची जबाबदारी असलेल्या नागपूर ग्रामीण पोलीस दलात सध्या ‘उलट गंगा’ वाहताना दिसत आहे. गुन्ह्यांची नोंद घेण्याऐवजी ती ‘वजा’ करण्याची आणि वसुलीला ‘प्लस’ करण्याची अजब किमया सध्या नागपूर ग्रामीण अंतर्गत जोरात सुरू असल्याची धक्कादायक चर्चा आहे. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक (SP) म्हणून ठाण मांडून बसलेले हर्ष पोद्दार हे विदर्भाच्या इतिहासात अत्यंत कमकुवत पोलीस अधीक्षक म्हणून नोंदवले गेले आहेत, अशी सडकून टीका आता दबक्या आवाजात होऊ लागली आहे.

​ठाणेदारांची मनमर्जी; एसपींचा वचक संपला?

​वरिष्ठ अधिकाऱ्यांचा धाक उरला नसल्याने ग्रामीण भागातील विविध पोलीस ठाण्यांचे ठाणेदार आता आपल्या ‘मनमर्जीनुसार’ कारभार हाकत आहेत. पोलीस अधीक्षकांचा केवळ वाचकनामा किंवा तोंडी आदेशच उरले असून, प्रत्यक्षात मात्र परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे चित्र आहे. अधिकारी फक्त नावालाच उरले असून प्रत्यक्ष मैदानात कायदेतज्ज्ञ नव्हे, तर ‘वसुली बहाद्दर’ सक्रिय झाले आहेत.

मौदा पोलीस ठाण्यात ‘रोशन’ नावाच्या कर्मचाऱ्याचा वसुलीचा ‘डबल धमाका’!

​ग्रामीण पोलिसांच्या या कारभाराचा सर्वात मोठा आणि विस्फोटक चेहरा मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आला आहे. मौदा सारख्या आर्थिकदृष्ट्या भक्कम आणि संवेदनशील भागात, नुकतेच नवीन ठाणेदार रुजू झाले आहेत. मात्र, या नवीन ठाणेदारांच्या नावाचा गैरफायदा घेत तिथल्याच ‘रोशन’ नावाच्या एका पोलीस कर्मचाऱ्याने चक्क ‘वसुलीचे डबल धोरण’ राबवल्याची जोरदार चर्चा आहे.

: नवीन साहेबांच्या नावावर दुप्पट वसुली गोळा करण्याचा हा अधिकार या कर्मचाऱ्याला दिला कुणी? हा सगळा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू आहे की काय, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. पोलिसांना फक्त ‘पैसे’ हवेत की ‘कारवाई’ करायची आहे, याचा सोक्षमोक्ष लागणे आता गरजेचे झाले आहे.

गुन्हेगारांवर नियंत्रण की पैशांवर नजर?

​खरं तर पोलिसांची मुख्य भूमिका ही गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवून सर्वसामान्य जनतेला सुरक्षा देणे ही असायला हवी. मात्र, नागपूर ग्रामीणमधील या यंत्रणेची सुई गुन्हेगारांऐवजी ‘वरकमाई’वर स्थिरावली आहे की काय, अशी शंका घेण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मौदा आणि परिसराच्या हद्दीत प्रचंड प्रमाणात ‘बाहेरगोष्ट’ म्हणजेच अवैध धंदे आणि आर्थिक उलाढालींमधून उत्पन्न गोळा करणारी एक मोठी समांतर यंत्रणा सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे.

​गेल्या तीन वर्षांत नागपूर ग्रामीणचा गुन्हेगारी आलेख कुठल्या कुठे पोहोचला असताना, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार मात्र या गंभीर बाबींकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे. मौदा परिसरातील हा ‘वसुलीचा मोठा अध्याय’ आता चव्हाट्यावर आला असून, गृहविभागाने यावर तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!