लाचखोरीचा तपास, मंजुरीची प्रतीक्षा….
नागपूर-यवतमाळ जिल्ह्यातील महसूल-पोलीस विभाग भ्रष्टाचार च्या यादीत ACB च्या रडारवर?*
—————————————–
मुंबई /चंद्रपूर/यवतमाळ/नागपूर*
( *28 फरवरी 2025)*
( सुशांत घाटे )
लाचखोरांना लाच घेताना पकडल्यानंतर राज्यातील 423 प्रकरणात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाला बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात पुढील चौकशी साठी राज्य सरकार, विविध विभाग आणि महापालिकांच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.चौकशीत अनेक अधिकाऱ्यांची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली असून गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगी मिळत नसल्याने भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घातले जात आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई साठी मागितलेले 117 प्रकरण राज्य शासनाकडे आणि 306प्रकरणे विविध विभाग आणि महापालिका कडे परवानगी साठी अद्याप धूळ खात पडले आहे.
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 17(अ)नुसार भ्रष्ट शासकीय अधिकाऱ्यां विरोधात तपास सुरु करण्यापूर्वी ACB ला संबंधित विभागातील सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र अनेक लाचखोर सक्षम अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी परवानगी अद्याप देण्यात आली नाही आहे.
भ्रष्टाचार विभागातील यादी तैयार….
राज्यातील भ्रष्टाचार यादीतील राज्य सरकार कडे आणि विविध विभागाकडे पोलीस दलातील 82,नगरविकास आणि महापालिका मधील 53,महसूल विभागातील 63तर ग्राम विकास-जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील 65 प्रकरणे मंजुरीत पुढील चौकशी साठी ACB वाट बघत आहे.
भ्रष्टाचार च्या वाढत्या तक्रारी….
राज्यातील भ्रष्टाचार च्या तक्रारी चा ओघ वाढत असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यातील अनेक लाच खोरांना लाच घेताना जाळ्यात अडकवले आहे.
विदर्भात भ्रष्टाचार च्या जाळेत अनेक विभागाच्या लाचखोर अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना रंगेहाथ अटक करत लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने 2024-25 मध्ये उल्लेखनीय कारवाई केली आहे.
नागपूर -चंद्रपूर ACB ची धडाकेबाज कारवाई…
नागपूर येथील दोन पोलीस अधिकाऱ्यांना नागपूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या महिन्यात लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने पोलिस विभागात खळबळ माजवली. त्या पाठोपाठ चंद्रपूर ACB ने गेल्या वर्षी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकाच्या आणि त्यांच्या दोन अधिकाऱ्यांना अटक करीत राज्यात खळबळ माजवून दिली होती. पोलीस विभागातील ही चंद्रपूर ने लागोपाठ ट्रॅप करत भ्रष्टाचार करणाऱ्या ला चांगलाच धाक दाखवला आहे.
चंद्रपूर ACB च्या पोलीस उप अधीक्षक मंजुषा भोसले यांनी नुकताच चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील एका ग्रामीण भागातील ग्रामसेवकाला विस हजार रुपयाच्या लाचेच्या संदर्भात रात्री लाच घेताना अटक केली. विशेष म्हणजे ग्रामीण भागात रस्ते ठीक नसताना रात्रीच्या अंधारात प्रवास करीत लाच घेणाऱ्या लाचखोरास अटक करण्यासाठी जवाबदारी स्वीकारत हा ट्रॅप यशस्वी करून दाखवला.
लाच खोराच्या मुसक्या आवळण्यात चंद्रपूर ACB ने आता पर्यंत दणकेबाज कारवाई राज्यभरात केली आहे.
💢यवतमाळ – नागपूर चे पोलीस, महसूल विभागातील अधिकारी ACB च्या रडारवर..💢
भ्रष्टाचार च्या तक्रारी चा ओघ वाढला असून यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यातील काही भ्रष्ट महसूल आणि पोलीस विभागातील अधिकारी ACB च्या रडारवर आले आहे.यवतमाळ जिल्ह्यातील
तक्रार दारांचा ओघ हा जिल्ह्यातील स्थानिक भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागात जात नसून जिल्हा बाहेर इतर यंत्रणा कडे जात असल्याने यवतमाळ ACB कडे का नाही? याचे उत्तर शोधण्याची गरज आहे.
….. 
दोन जिल्ह्यातील सलग कारवाई होत असताना पाहिजेल तसें कारवाई चा फास वर्धा, भंडारा, यवतमाळ, गडचिरोली विभागाला भ्रष्टाचार संदर्भात करता आला नाही. विश्वसनिता आणि गोपनीयता ही मोठी जवाबदारी ACB वर असते. जिल्ह्यातील ट्रॅप हा दुसऱ्या जिल्ह्यातील खांद्यावर तेव्हाच दिला जातो जेव्हा तक्रार दाराला विश्वसयनीता नसते?
लाच देणे आणि घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. आपल्यास कोणी लाच मागत असेल तर त्याची थेट तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे करा.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

