Saturday, June 6, 2026
HomeBreaking News"तो" हॅलो.. हॅलो... करत राहीला आणि त्याचा मोबाईल...चोरट्यानी गहाळ केला...

“तो” हॅलो.. हॅलो… करत राहीला आणि त्याचा मोबाईल…चोरट्यानी गहाळ केला…

चंद्रपूर -23 फरवरी 2025

हॅलो.. हॅलो…
“तो” अत्यंत हुशार त्याच्या कामाची पावती म्हणजे टाचणी पडली तरी त्याला आवाजाची चाणक्यता मात्र आज त्याची प्रचिती अशी झाली की तो ब्लु टूथ वर हॅलो.. हॅलो… करत च राहीला आणि त्याचा भ्रमणध्वनी दूर वर जातं स्विच ऑफ झाला… आणि तो हताश होत इकडे तिकडे शोधत राहीला.

चंद्रपूर येथील जुनोना चौकातील भाजीबाजार परिसरात वर्धळीच्या ठिकाणी आज सकाळ च्या नव वाजताच्या सुमारास बाबुपेठ येथील मिरची चे व्यापारी अनिल खोब्रागडे हे भाजीपाला घ्यायला गेले असता चोरट्यानी त्यांचा मोबाईल शिताफिने चोरी केला.

 सकाळच्या सुमारास अनिल खोब्रागडे ब्लू टूथ चे हेड फोन लावून भाजी खरेदी करीत होते. हा परिसर त्यांच्या साठी जुनाच होता, भाजी खरेदी करता करता ते फोन वर बोलतच होते, बोलता बोलता अचानक मोबाईल ची रेंज कटली तर आवाज ऐकू येत नव्हता. तसाच अनिल नी खिशातला मोबाईल ला हाथ लावला मात्र मोबाईल खिशातून गायब झाल्याचे दिसलें. पेन, कागद पासून सावध गिरीचा पवित्रा ठेवणारे खोब्रागडे मोबाईल चोरी मुळे अस्वस्थ झाले.

मोबाईल चोरी होने काही तशी नवीन गोष्ट नाही पण चाणक्य नितीने त्यां दोन 25 वर्षीय वयोगटातील युवकांनी खोब्रागडे चा मोबाईल चोरी करणे म्हणजे अकलेचे तारे तोडने म्हणावे लागेल. शहरातील अनेक मोबाईल चोरी ला जातं असताना त्याच्या तक्रारी चा पाढा वाढतच आहे. पण यां विनोदी नाट्यमय घटनेने खोब्रागडे चे हित चितकांना धक्का बसला आहे. तो म्हणजे अनिल चा मोबाईल चोरी ला… शक्यच नाही पण हो तो चोरीला च गेला. अत्यंत हुशार,चतुर व्यक्ती ला ही चोरांनी शेंडी लावल्याने बाबुपेठ परिसरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!