वाहतूक पोलिसांची “नाकेबंदी”खिसा वसुली?
चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील महामार्ग वाहतूक पोलिसांची त्रिकोणी वसुली!
नागपूर/चंद्रपूर/वर्धा/यवतमाळ
(02 मार्च 2025 –
सुशांत घाटे —
(EPISODE -01)
राज्यातील हायवे वर दररोज अपघाताचा आकडा हा वाढतच असताना मात्र सुचारू रूपाने ट्राफिकिंग करण्यापेक्षा,ई- चालान च्या नावाखाली दररोज लाखो रुपयाची महामार्ग वर रहदारी होणाऱ्या ट्रक, मोटर वाहन, मालवाहक आणि दुचाकी ला टार्गेट करत विदर्भातील तीन जिल्ह्यात अवैध खिसा वसुली चा एन्ट्री नामा पांढऱ्या पोशाखातील महामार्ग पोलीस करत आहे?
चंद्रपूर,वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील महामार्ग पोलिसांना या मोहिमेतून शासनाच्या तिजोरीत ई-चालान भरण्यात रस नाही तर तो स्वतःच्या खिशात भरण्यात अधिक मोह असल्याचे उघडकीस आले आहे?
महामार्ग वाहतूक पोलिसांचे प्राथमिक उद्धीष्ट म्हणजे नागरिकांच्या सुरक्षेतीची खात्री करून वाहतूक प्रवाहात सुधारणा करणे आणि गाडी चालवताना अपघात घडल्यास गरजुंना आपत्कालीन मदत देणे हे असताना यांचे वेगळेच धोरण दिसू लागले आहे.
वर्धा महामार्ग वाहतूक पोलीस…
वर्धा जिल्ह्यातील जाम जवळ राज्य महामार्ग वाहतूक पोलिसांचे कार्यालय आणि चौकी हायवेवर आहे. मोठ्या प्रमाणात ट्रकांची लाईन या ठिकाणी असते,
कागदपत्रे तपासाने हा हेतू जरी असला मात्र एन्ट्री ची “किमया” त्या ट्रकची आहे की नाही हा सर्वात आधी रेकॉर्ड तपासला जातो. असेल तर ठीक, नाही तर त्याला ओव्हरलोड, आणि कुठल्या ना कुठल्या ट्रॅफिक निकष चे नियम सांगून त्याची नाकेबंदी खिसा वसुली उभारली जाते!
दररोज या महामार्गवरून हजारो ट्रक –वाहने चंद्रपूर, हैद्राबाद च्या मार्गाने जात असतात. त्याची एंट्री वसुली ही विशिष्ट वाहतूक पोलिसाला दिली आहे जो दरमहा लाखो चा गल्ला उभारून आपल्या आकांना देत असतो?
मुख्य म्हणजे दुचाकी ना सुद्धा हे महाशय आड मार्गाना अडवून ई- चालान च्या नावाखाली आपले खिसे गरम करत असल्याचे चित्र या महामार्ग पोलिसांकडून दिसत आहे.
यवतमाळ महामार्ग वाहतूक पोलीस…
यवतमाळ जिल्ह्यातील नागपूर -हैद्राबाद हायवे ला जात असताना करंजी गावाजवळ महामार्ग पोलिसांनी तर चक्का जाम च ट्रकांचा करून दाखवाल्याचा प्रलय दिसतो. 10-12 वाहतूक शिपाई रस्त्यावरती ट्रकांच्या गाडयांना अडवून महामार्ग वाहतूक कार्यालयात पाठवून, उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या (RTO)च्या चेकपोस्ट सारखेच शुल्क वसुली करतात का असेच चित्र निर्माण करून बसले आहे!दररोज हजारोच्या संख्याने होणाऱ्या वाहनांची महामार्गवरील चालान च्यां नावाखाली जोरदार अवैध वसुली चा लाखोचा अड्डा या ठिकाणी बनला आहे?
चंद्रपूर महामार्ग वाहतूक पोलीस….
चंद्रपूर जिल्ह्यातील हीच वस्तुस्थिती असून भद्रावती नजीक कोंढा फाट्यावर सुद्धा सकाळी सात ते दिवस बुडे पर्यंत अप -डाऊन दोन्ही रस्त्याच्या महामार्गला वाहतूक पोलीस ड्युटी करीत दुचाकी आणि मालवाहतूक वाहनांना टार्गेट करत वसुली चा अभिनव उपक्रम करत असतात शासनाच्या तीन चालान तर स्वतःच्या खिशाच्या दहा चालान हा विशिष्ट फार्मुला यां ठिकाणी प्रसिद्ध झोतात आला आहे! ग्रामीण भागातील गरीब नागरिकांना यांचा मोठा फटका बसत आहे.
यांची वसुली याच महामार्गांवर नाही तर वाघाच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ज्या ठिकाणी तूट -पुंजे डांबरी रस्ते आहे त्यां भागात महामार्ग वाहतूक पोलीसजिथे महामार्ग नाही तिथे 100 किलोमीटर चा प्रवास करून दिवस भऱ्याचा चालान च्या नावावर (आर्थिक )भंडार स्वतःचा खिशात भरून आणतात इतकेच नव्हे तर जिल्ह्यातील जवळपास सर्वांच ट्रान्सपोर्ट धारकां कडून हफ्ता वसुलीचे दरपत्रक साठी एका शिपायला सुद्धा नियुक्त केले आहे.
महामार्ग पोलिसांनी आधी सुचारू पद्धतीने वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेव्हावी, आपत्कालीन साठी नेहमी तत्पर राहावे कारवाईचा बडगा ही उभारावा!कायदा मोडणाऱ्या विरुद्ध कारवाई ही करावी मात्र वर्ष भर च मार्च एंडिंग सारखे वसुली टार्गेट राबवण्यापेक्षा नागरिकांना अधिक त्रास होऊ नये याची दक्षता सुद्धा घ्यावी!
भ्रष्टाचाराचा चेहरा मोहरा लवकरच डेली पोस्ट मार्टम यां संदर्भात यादी सहित प्रकाशित करणार आहे.वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर यां तिन्ही ही जिल्ह्यातील महामार्ग वसुली बाज….
भाग -2 मध्ये…. लवकरच…
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

