मोठी बातमी : विक्रीपत्र व करारनामे नियमाकुल करून घेता येणार; पण ही आहे मुदत

0
704

चंद्रपुर: नोटरी केलेले अथवा न केलेले विक्रीपत्र व करारनामे नियमाकुल करून घेता येणार

चंद्रपुर, दि. 16 (प्रतिनिधी): महाराष्ट्र सरकारने मुद्रांक शुल्क व दंड सवलत “अभय योजना 2023” लागू केली आहे. ही योजना 1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 आणि 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 अशा दोन टप्प्यात लागू केलेली आहे.

या योजनेनुसार,

  • 1 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधित निष्पादीत झालेल्या दस्तऐवजाचे संदर्भात,

    • पहला टप्पा: दि. 01.12.2023 ते दि. 31.01.2024 या कालावधीत अर्ज सादर केल्यास,
      • रु.1 ते रु.1 लाख इतक्या फरकाचे रक्कमेसाठी मुद्रांक शुल्क व दंडामध्ये 100% माफी दिली आहे.
      • रु.1 लाखापेक्षा जास्त मुद्रांक शुल्क 50% माफ व दंड 100% माफ केला आहे.
    • दुसरा टप्पा: दि. 01.02.2024 ते दि. 31.03.2024 या कालावधीत अर्ज सादर केल्यास,
      • रु.1 ते रु.1 लाख इतक्या फरकाचे रक्कमेसाठी मुद्रांक शुल्क 40% व दंडामध्ये 80% माफी दिली आहे.
      • रु.1 लाखापेक्षा जास्तचे प्रकरणात मुद्रांक शुल्क 40% माफ व दंड 70% माफ केला आहे.
  • 1 जानेवारी 2001 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधित निष्पादीत झालेल्या दस्तऐवजाचे संदर्भात,

    • पहला टप्पा: दि. 01.12.2023 ते दि. 31.01.2024 या कालावधीत अर्ज सादर केल्यास,
      • अ.रु.1 ते रु.25 कोटी इतक्या फरकाचे रक्कमेसाठी मुद्रांक शुल्क 25% व दंडाची रक्कम 25 लाखापेक्षा कमी असल्यास 90% माफ व दंडाची रक्कम रु.25 लाखापेक्षा जास्त असल्यास केवळ रु.25 लाख भरणे व त्यापुढील रकमेस सवलत.
      • बा.रु.25 कोटीपुढील जास्त असलेल्या- मुद्रांक शुल्क फरकाचे मुद्रांक शुल्कामध्ये 20% सवलत व दंडामध्ये रु.1 कोटी फका भरावयाचे व पुढील रकमेसाठी सवलत.
    • दुसरा टप्पा: दि. 01.02.2024 ते दि. 31.03.2024 या कालावधीत अर्ज सादर केल्यास,
      • अ.रु.1 ते रु.25 कोटी इतक्या फरकाचे रकमेसाठी मुद्रांक शुल्क 20% सवलत व दंडामध्ये
        1. दंडाची रक्कम रु.50 लाखांपेक्षा कमी असल्यास 80% माफी आणि जर
        2. दंडाची रक्कम रु.25 लाखापेक्षा जास्त असल्यास केवळ रु.50 लाख भरणे व त्यपुढील रकमेरा सवलत
      • ब) रु.25 कोटीपेक्षा जास्त असलेल्या मुद्रांक शुल्क फरकाचे रकमेसाठी मुद्रांक शुल्कामध्ये 10% सवलत दंड जास्तीत जास्त रु.2 कोटी भरावा लागेल व त्यापुढील रकमेस सवलत.

या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी अंकिता तांदळे यांनी केले आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here