चंद्रपूर, 18 नोव्हेंबर 2023** – चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प परिसरातील सरकार नगर येथे घरफोडी झाली होती. त्या अनुषंगाने रामनगरचे पोलीस पथक चोरांच्या मागावर होते. या घरफोडीमध्ये रक्षक च भक्षक निघाल्याचे वास्तव्य समोर आले आहे. चक्क एलसीबीच्या नरेश डाहूले या पोलीस कर्मचाऱ्याने नेच पोलिसांच्या प्रतिमेला काळे फासले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार नगर येथील एका घरातून साहित्य चोरून नेण्यात आली होती. या प्रकरणी पीडिताने रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तपास सुरू केला.
पोलिसांच्या तपासानुसार, या घरफोडीत नरेश डाहूले या पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. डाहूले याने ही घरफोडी केली होती. या घटनेमुळे पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांवर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांवर या घटनेचा मोठा परिणाम झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. यात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास सुरू आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

