Sunday, April 19, 2026
HomeBreaking Newsपोलीस अधिकाऱ्यांची बदल्यांची शेवटची यादी धडकणार! नो कॉल फार पोस्टिंग.. मॅडम DG...

पोलीस अधिकाऱ्यांची बदल्यांची शेवटची यादी धडकणार! नो कॉल फार पोस्टिंग.. मॅडम DG नी नेत्यांना दूर सारले?

चंद्रपूर/मुंबई -(4 जून 2025)
सुशांत घाटे
……………..
राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे तीन वेगवेगळ्या टप्यात याद्या बाहेर आल्या, त्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी(IPS) ते पोलीस निरीक्षक पदाचा या मध्ये समावेश होता. मात्र याच धूमधडक्यात DCP/ASP/ACP/ SDPO यांच्या बदल्यासाठी होत असलेल्या दिरंगाई ने महाराष्ट्र तील काही पोलीस अधिकाऱ्यांमध्ये तळ्यात की मळ्यात अशी चाहूल झाली आहे.

👮‍♂️काही अधिकाऱ्यांनी आप- आपल्या पोस्टिंग साठी विशेष राजकीय नेत्या मार्फत शिफारशी ची कुलूपाला किल्ली लावली आहे. तर दुसरी कडे काही पोलीस अधिकाऱ्यांनी जिथे बदली होइल तिथे जाण्याचा पवित्रा घेतला आहे.

👇
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांनी यावेळेस पोलीस अधिकाऱ्यांचा कार्यकाळ नजरेत ठेवून बदल्याचे आदेश गृहविभागाच्या पटलावर दिले आहे.
विश्वसनिय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील बदल्या संदर्भात नेतागिरी बाजूला सारत पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांनी आपल्या कोअर कमिटी मार्फत राज्यातील आगामी येणाऱ्या निवडणुकी च्या दृष्टिकोनातून तसेच राज्यातील गुन्हेगारीत वाढलेल्या जिल्ह्यात सक्षम दर्जेदार अधिकाऱ्यांना स्ट्रॉंग झोन मध्ये समाविष्ट केल्याची माहिती आहे. त्याबाबतीत त्यांनी नो कॉल फॉर पोस्टिंग चा सल्ला काही नेत्यांना दिला आहे.
येणाऱ्या काही दिवसातच अतिरिक्त पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या बदल्यांचे आदेश धडकणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 9 किंव्हा 10जून रोजी राज्यातील शेवटची बदल्यांची यादी पोलीस विभागतील असल्याचे संकेत मिळाले आहे.
चंद्रपूर, भंडारा, नागपूर सिटी, नागपूर ग्रामीण, वर्धा जिल्ह्यातील जवळपास 11 अधिकाऱ्यांचा यां बदल्या मध्ये नाव समाविष्ट असल्याची विश्वसनीय माहिती  आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!