भ्रष्टाचार चा घुट घेतल्या शिवाय झोप नाही येत अधिकाऱ्याला?
चंद्रपूर (27 एप्रिल2025 )
(सुशांत घाटे)
- 🌟मद्द्य परवाने वाटपात अनियमितता, बेकायदेशीर, लाचखोरी चा अड्डा बनलेल्या, SIT च्या जाळ्यात असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाची प्रचिती म्हणजे तोंडाला काळ पुसण्याची वेळ आणलेली यंत्रणाचं म्हणावी लागेल?
गेल्या वर्षी लाचखोरीच्या प्रकरणात अडकलेला राज्य उत्पादन शुल्क विभागातील मोठा बागडबिल्ला संजय जयसिंगराव पाटील आणि त्याच्या दोन सहकार्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाई ची शाही अद्यापही सुखायची आहे! तरी मात्र लाच घेण्याची आदत अजूनही या विभागातील अधिकाऱ्याची गेलीच नाही?
भ्रष्टाचाराची मालिका अजूनही चंद्रपूर जिल्ह्याच्या शहरी भागा पासून ते ग्रामीण विभागाच्या कानाकोपऱ्यात बिन्दास्त पणे सुरु आहे.
महिन्याकाठी वेगवेगळ्या चार चाकी वाहनांचा वापर करून राज्य उत्पादन शुल्क विभागातील भ्रष्ट वसुलीखोर,तारीख आली का वसुलीबाज गुल्लर चा नेम लावत लाखोच्या घरात हफ्तेखोरी करत असल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आले आहे?
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा डिव्हिजन अंतर्गत एक्ससाईझ निरीक्षक विकास थोरात यांनी गेल्या तीन वर्षामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार लाचेच्या स्वरूपात स्वीकारून अंबर दिवा लावल्याचे गोपनीय वृत्त आहे?
जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात आपली कार्यकिर्द गाजवून वसुलीसाठी ठेवलेला हवालदार जगदीश म्हस्के आणि शेलार नावाचा राज्य उत्पादन शुल्क विभागातील कर्मचारी यांची पूर्ण वसुलीचा विल्हेवाट लावणारा पहरेदार म्हणून काम पाहतो!
भद्रावती, वरोरा, शेगाव, माजरी, दुर्गापूर, चंदनखेडा, माढेळी अशा अनेक परिसरातून अवैध दारू विक्रेत्या कडून ते परमिट रूम धारकांना आपल्या किमया गाजवत महिन्याकाठी हे हफ्ते च्या बंडलीची रोख रक्कम जमा करून उत्पादन शुल्क विभागाच्या व्यासपीठावर भ्रष्टाचाराचे नाव गोंदवीत आहे?
500 रुपया पासून ते 40000 हजार रुपया पर्यंत अवैध दारू विक्रते ते परवाना धारकांना कायद्याच्या परीभाषेतून माफ करण्याच्या जुर्माना राशींतून हफ्ते खोरी चे मोठे रॅकेट राज्य उत्पादन शुल्क विभागातील हवालदार जगदीश म्हस्के आणि शेलार नावाचा कर्मचारी त्यांचा बहिरमी असणाऱ्या विकास थोरात नावाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागातील वरोरा निरीक्षकाला दरमहा 10 तारखेच्या च्या कालावधीत 12 लाखाचा डल्ला सवरून देत असल्याचे विश्वासनीय वृत्त आहे?
गेल्या तीन वर्षाच्या कार्यकाळात विकास थोरात नी भ्रष्टाचारा मधुन करोडोची बेनामी चल-अचल संपत्ती बनवली आहे?
महिन्याकाठी शासनाचा गल्लेलठ्ठ पगार गिळणाऱ्या या अधिकाऱ्याला तहान भागवताना भ्रष्टाचाराचा घुट पिल्या शिवाय झोप येत नाहो?
दोन कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून बार परवाने धारक, देशी भट्टी, बियर शॉपी, वाईन शॉप, अवैध दारू विक्रते या कडून वेगवेगळ्या वसुलीचा हिस्सा घेणाऱ्या झेंडू बाम ची म्हणजे भ्रष्टखोर प्रणालीतले ते राज्य उत्पादन शुल्क विभागातील कर्तव्यदक्ष विकास अधिकारी आणि कर्मचारी यांनी बरीच लुफ्तता आतापर्यंत सांबळली आहे?
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री अजित पवार यांनी भ्रष्टाचाराचे या अधिकाऱ्यांना रान मोकळे करून दिले आहे का हा मोठा प्रश्न पडला आहे?
त्यांचा वचक या भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राहला नाही का? ओपन चालेंज करून वसुली करणाऱ्या या अधिकाऱ्यां सोबत त्यां कर्मचाऱ्यांवार केव्हा कारवाई करणार आहात?
अशा अनेक प्रश्नाची यादी मंत्री साहेब तैयार आहे! आपल्या पर्यंत डेली पोस्टमार्टम याचे पुरावे सुद्धा बातमी च्या माध्यमातून सादर करणार आहे. मात्र या विभागाला लागलेली भ्रस्टाचाराची कीड म्हणजे डीमग बनत चालली जात आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

