Thursday, April 16, 2026
HomeBreaking Newsचंद्रपूर पोलीस विभाग तर्क- वितर्क ला विराम... LCB चा नवीन कर्णधार अमोल...

चंद्रपूर पोलीस विभाग तर्क- वितर्क ला विराम… LCB चा नवीन कर्णधार अमोल काचोरे…

 

चंद्रपूर -(22 फरवरी 2025)

⚛️सुशांत घाटे ⚛️

🌟चंद्रपूर पोलीस दलात काल अचानक पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी फेरबदल करीत चार पोलीस निरीक्षक यांच्या बदल्यांचे आदेश काढले.

या बदली मध्ये सर्वात मोठी ब्रँच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेला सर्वाधिक पसंती दर्शविल्या जाते. या शाखेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी आप आपल्या राजकीय वरदहस्त गाठत ही शाखा आपल्याला मिळावी या साठी प्रयत्न ही चालविले मात्र अचानक आलेल्या आदेशाने अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या स्वप्ना वरती पाणी फिरले आणि मावळते स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी हा चार्ज भद्रावती चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांना आज दिला.

⚛️     कोण आहेत पोलीस निरीक्षक काचोरे…..

👉अत्यंत मिळाऊ स्वभावाचे म्हणून ओळखल्या जाणारे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांची पहिली पोस्टिंग ही चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा पोलीस स्टेशन ला झाली, त्यानंतर काही कारणास्तव त्यांना नागभीड पोलीस स्टेशन येथे बदलन्यात आले.

पण अल्पवधितच त्यांना त्या ही ठिकाणाहून बदली करत त्यांची भद्रावती पोलीस स्टेशन ची पोलीस निरीक्षक पदी वर्णी लावत जवाबदारी देण्यात आली होती. कायद्यात कुठलीही परिस्थिती ला हाथाळण्याची त्याच्यांत किमया असल्याचेही बोलल्या जाते. प्रामाणिक आणि विश्वासू म्हणून त्यांची पोलीस खात्यात ओळख आहे.

पोलीस विभागातही त्यांची मनमिळाऊ अधिकारी म्हणून ओळख आहे. कुठल्या कारभारात लक्ष न घालता,ओन्ली पोलिसिंग फॅक्टर वर ते नेहमी जोर देत असतात.चंद्रपूर जिल्ह्यात त्यांच्या या पोस्टिंग मुळे अनेक तर्क वितर्क ला, शेवटी त्यांची स्थानिक गुन्हे शाखेला नवीन कर्णधार च्यां स्वरूपात पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी विराम लावला आहे.

⚛️मागील पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांची LCB ला उत्तम कामगिरी…

📕मागील पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी सुद्धा स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी रीत्या कामगिरी फतेह केली आहे. गुन्हेगारी क्षेत्राला पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात ड्रुग्स सारख्या मोठ्या रॅकेट ला उध्वस्त करीत तडफदार कारवाई त्यांनी नुकतीच ठोकली आहे. जिल्ह्यात गुन्हेगारी युनिट ला ही त्यांनी बरीच फटकार लावत कारकीर्द गाजवत आज स्थानिक गुन्हे शाखेला समारोप दिला आहे.

  1. पोलीस अधीक्षक यांचे दिशा निर्देश….
    पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला ऍक्टिव्ह पणे उभारत नवीन दिशा निर्देश दिले आहे.
    जिल्ह्यातील गुन्हेगारी यंत्रनेला नवीन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे हे पूर्ण विराम कितपत देतील हे तितकेच महत्वाचे आहे. त्यांचा पोलीस विभागातील अनुभव हा दांडगा असून त्यांनी नागपूर शहरात सुद्धा पोलीस विभागात यशस्वी कारवाई केली असल्याने त्याच्या कडे सोपवलेली जवाबदारी ते यशस्वी पार पाडणार असा त्यांना विश्वास आहे. या सोबतच स्थानिक गुन्हे शाखे मध्ये कार्यान्वित असलेले अधिकारी सुद्धा आता पर्यंत च्या कार्यकाळात दिलेली जवाबदारी चे योग्य प्रकारे पालन करीत असल्याने अनेक गुन्हे सुद्धा त्यांनी उकळून काढले आहे.
  2. स्थानिक गुन्हे शाखेला दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि तीन पोलीस उपनिरीक्षक….…..
  3. ⚛️स्थानिक गुन्हे शाखेला हल्ली दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक, आणि तीन पोलीस उपनिरीक्षक कार्यरत आहे.जलद गतीने गुन्हेगारी आणि अवैध धंद्याना त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने कारवाई करीत सध्या च्यां घडीला विदर्भात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा  नंबर एक वर आहे.
  4. स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक काक्रेडवार, झामोडकर तसेच पोलीस उपनिरीक्षक संतोष निंबोरकर, मधुसूदन सामलवार आणि विनोद भुरले आणि चार टीम सध्या हल्ली स्थानिक गुन्हे शाखेला विराजमान आहे.
  5. कर्णधार ची फटकेबाजी लवकरच…
  6. ⚛️स्थानिक गुन्हे शाखेला नवीन कर्णधार लाभलेल्या पोलीस निरीक्षक यांची लवकरच फटकेबाजी पाहायला मिळणार आहे. गुन्हेगारी चा कर्दनकाळ म्हणून त्यांची खास ओळख आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!