Thursday, April 16, 2026
HomeBreaking Newsकाँग्रेस ला चंद्रपूर विधानसभा मध्ये जिंकण्याची इच्छा नाही काय? कीती वेळ...

काँग्रेस ला चंद्रपूर विधानसभा मध्ये जिंकण्याची इच्छा नाही काय? कीती वेळ तेच करणार…. जिंकणाऱ्या उमेदवाराला सोडून…. काँग्रेस हायकामंड काय सिद्ध करत आहे? नेत्यांच्या राजकारणाचे फळ….

चंद्रपूर – 29 ऑक्टोबर

✨✨✨✨
“राजकारणात”काही ही होऊ शकते याचा प्रत्येय चंद्रपूर जिल्ह्यात प्रमुखतेने पहायला मिळाला आहे. सतरंज्या उचला की नेत्याच्या मागे घिरट्या घालून आपली नैतिकता दाखवा पण जे वेळ साधेल त्याचा चं वरचष्मा, या विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपा संदर्भात प्रमुख राष्ट्रीय पक्षाच्या यादीत दिसून आले.

👉दूर दुरून निवडून येण्याचे कुठलेही चित्र दिसत नसताना मात्र स्वतःच्या हौशी आणि जिद्दीने मात्र मला तिकीट हवी असा डाव साधणाऱ्या, आणि पक्षाला मी मोठा आणि वाट दाखवणाऱ्या त्या दोन्ही ही राष्ट्रीय पक्षातील नेत्यांनी चांगलीच जंग आपसात लावली आहे.
💥चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आणि पक्षातील नेत्यांनी विधानसभा साठी गेल्या एक दीड वर्षांपासून सुनियोजित पद्धतीने काँग्रेस पक्षा कडून आपल्या ला विधानसभा ची उमेदवारी भेटावे या साठी उंबरठे झिजवले.
सामाजिक नेतृव मध्ये उभे राहून भेटी गाठी, कार्यक्रम याची आखनी करीत विविध संघटन आणि आंदोलन या ठिकाणी सक्षम पद्धतीने राजू झोडे, सुधाकर अंबोरे, महेश मेंढे, अनुताई दहेगावकर यांच्या सोबत दिलीप कांबळे आणि शेवटच्या ठिकाणी प्रवीण पडवेकर
लाईनीत होते. खरेतर या विधानसभा निवडणुकीच्या तैयारीत जी आशा होती ती राजू झोडे यांना तिकीट मिळाली तर काँग्रेस या ठिकाणाहून नक्की जिंकेल, जर या व्यतिरिक्त सुधाकर अंबोरे यांच्या सुद्धा नावाची जोरदार चर्चा होती त्या साठी गेल्या वर्षा भरापासून त्यांनी मोठी मेहनत सुद्धा घेतली. आणखी एक नाव चर्चेत आले ते म्हणजे डॉ. दिलीप कांबळे विशेष ता काँग्रेस च्या चाचपनित या तिन्ही ही नावाला डावलत प्रवीण पडवेकर यांना काँग्रेस ची दावेदारी देण्यात आली.

👉मात्र या ठिकाणी काँग्रेस ला स्वतःच निवडून न येण्याचा मानस दिसत आहे. अपक्ष असलेल्या आमदार जोरगेवार यांना सुद्धा पूर्वी कुठल्याच पक्षाने स्थान दिले नाही, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी दूर सारथ त्यांना बाय.. बाय.. केले होते. त्यांनी अपक्ष लढण्याची तैयारी सुद्धा केली होती. मात्र ऐन वेळेवर दिल्लीतून हालचाली झाल्या आणि जोरगेवार यांना भाजप मधून तिकीट देण्यात आली. जोरगेवार समोर काँग्रेस चा उमेदवार हा कुठल्याही बाजूने सक्षम नाही असल्याचे सध्या चर्चेला उधान आहे.
चंद्रपूर विधानसभा ला जोरगेवार यांनी अपक्ष लढत विक्रमी निवडणूक मागील विधानसभा मध्ये जिंकली होती त्याच प्रमाणे काँग्रेस मधील राजू झोडे हे अपक्ष लढतील का या कडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
जोरगेवार यांना राजू झोडे हे सक्षम असताना घोळ झाल्याने काँग्रेस च्या कार्यकर्त्यात प्रचंड नाराजी असल्याचे चित्र दिसत आहे. आलेली वेळ सोडून महानगर पालिकेची निवडणूक न जिकणाऱ्या व्यक्तीला तिकीट देने म्हणजे काय? असा रोष सध्या पहायला मिळत आहे. ज्या व्यक्तीला तिकीट दिली तो व्यक्ती काँग्रेस मधून स्वतःच्या स्वार्थासाठी भाजप मध्ये सुद्धा पक्ष प्रवेश करून गेला असताना त्याला संधी काय? सध्या स्वतःची सीट स्वतःच हरायचा फार्मुला तर काँग्रेस नी तैयार केला नसावा असा ही सध्या भ्रम काँग्रेस च्या गोटात सुरु आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!