चंद्रपूर – 29 सप्टेंबर
. ✨सुशांत घाटे ✨
👲चंद्रपूर जिल्हा परिषद शिक्षण विभाग….
👉शिक्षण विभागातील भ्रष्टाचारा चा जिल्हा परिषद (माध्यमिक)येथील दोन विस्तार अधिकारी आणि एका सेवानिवृत अधिकाऱ्याच्या 70000 हजाराच्या लाचेच्या मागणीत,50000 रुपयाची लाच घेणाऱ्या आरोपीना अँटी करप्शन विभागाने अटकेत घेतले आहे.
👉चंद्रपूर न्यायालय मध्ये त्यांना ACB ने पेश केले असता,त्यांचा तीन दिवसाचा पी.सी.आर.(PCR)देण्यात आला आहे.
सावन चालखुरे, (विस्तार अधिकारी),लगुत्तम राठोड,( विस्तार अधिकारी )महेश कारुजी फुलझेले, ( सेवानिवृत्त जेष्ठ सहायक ) असे आरोपीचे नाव असून त्यांनी शिक्षणाधिकारी यांना पैसे दिल्याशिवाय संबंधित कामाला शासनाची मान्यता मिळणार नाही त्यामुळे तुम्हाला सत्तर हजार रुपये लाच द्यावेच लागेल असे सांगितले.✨तक्रार दाराची मुळीच लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने ACB चंद्रपूर ला तक्रार नोंदवली. पूर्णतः पडताळणी अंती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तिघांनाही अटक केली.
👩कोण आहे “ती”शिक्षणाधिकारी?
⚽या आधीच्या वादग्रस्त आणि भ्रष्टाचाराच्या,मोठ्या आरोपानी सध्या निलंबित असलेल्या जळगाव येथे असलेल्या कल्पना चव्हाण ह्या होत्या. जिल्हा परिषद चंद्रपूर येथील कार्यकाळ करतांना त्यांनी बरीच नियमांना तिरांजली देत कोट्यवधीचा भ्रष्टाचार केला असल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे? विधानसभा अधिवेशन दरम्यान त्यांच्यावर कारवाई करण्या करीता बरेच प्रश्न उपस्थित केले गेले, त्यानंतर त्यांना निलंबित करून कारवाई सुद्धा त्यांच्या बद्दल सुरु असल्याची माहिती आहे.
💥मुख्य केंद्रबिंदू यांच्या कार्यालयातून 💥
👇👇👇
✨त्यांच्या च कार्यकाळात सहाय्यक शिक्षणाधिकारी म्हणून जिल्हा परिषद येथे कार्यरत असलेली कुमारी निखिता ठाकरे यांना त्यांच्या च ठिकाणचा अतिरिक्त कार्यभार शिक्षणाधिकारी म्हणून देण्यात आला आहे.👉चंद्रपूर शिक्षणाधिकारी चा कार्यकाळात कल्पना चव्हाण ह्या बऱ्याच भ्रष्टाचाराच्या संदर्भात वादग्रस्त राहिल्या त्यांच्याच कार्यकाळात चेन(एका मेकांच्या साहाय्याने )नेटवर्क नी भ्रष्टाचाराचा केंद्रबिंदू जिल्हा परिषद विभागाच्या शिक्षण विभागात शिरला,अनेक जन याचे लाभार्थी सुद्धा राहिले आहे.बरेच भ्रष्टाचाराचे प्रश्न मार्गी लागले आणि कारवाई चा त्या वेळेस फास न आवरल्या गेल्याने मोठा भ्रष्टाचाराचा पुतळाच या विभागात बनविला गेला? कोणत्याही गोष्टीला नोटाचे बंडल सुंगावल्या शिवाय कामाला हातच न लावण्याचा पवित्रा या ठिकाणी पाहिला गेला?
✨एकाच माळेचे मणी?
👉खरेतर सर्व एका च माळेचे मनी असलेले आता कायद्याच्या चौकटीत भ्रस्टाचाराच्या सानिध्यात अडकले आहे. तीन दिवसाच्या कस्टडी मध्ये ACB च्या हाती भरपूर काही लागल्याचे विश्वासनीय वृत्त आहे.जलद गतीने पूर्णतः या संदर्भात ACB तपास करीत आहे. उदयाला या तिन्ही आरोपीना न्यायालयात हजर करण्यात येणार असून शिक्षणाधिकारी कुमारी निखिता ठाकरे वर सुद्धा कारवाई चा बडगा उभारला जाण्याची गोपनीय माहिती सूत्रांद्वारे मिळाली आहे.
गेल्या पाच सहा महिन्याच्या कार्यकाळात ले बरेच अपडेट्स ACB च्या हाती आले आहे. भ्रष्टाचाराचे मूळ बिंग शिक्षणाधिकारी च्या च कार्यलयातून ऍक्टिव्ह झाले आहे. ज्या अधिकाऱ्यांच्या तालमीत भ्रष्टाचार नी पोखरले त्याच पद्धतीने बिन दिक्कत डाव पेच खेळणारी ही महिला अधिकारी लवकरच ACB च्या रडारवर राहणार आहे.👇भागमभाग ‼️
चंद्रपूर जिल्हा परिषद च्या शिक्षण विभागाचा भ्रष्टाचार म्हणजे जिल्हा परिषद विभागाल लागलेली उदडी आहे. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना वेळीच फवारणी ACB ने केल्याने मोठा भागमभाग पवित्रा जिल्हा परिषद मध्ये सुरु आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

