Thursday, April 16, 2026
HomeBreaking Newsजिल्हा परिषद लाच प्रकरण, शिक्षणाधिकारी कुमारी निखिता ठाकरे वर अटकेची टांगती तलवार?...

जिल्हा परिषद लाच प्रकरण, शिक्षणाधिकारी कुमारी निखिता ठाकरे वर अटकेची टांगती तलवार? चौकशी च्या भीतीने सुट्या टाकून पसार!दलालांची फौज ठेवणाऱ्या बाबू ची होणार चौकशी? ACB ने फास आवळला..

चंद्रपूर 02 ऑक्टोबर (सुशांत घाटे )

📝जिल्हा परिषद शिक्षण विभागातील लाच प्रकरणाचा लाच लुचपत प्रतिबंधक  चंद्रपूर विभागाने  कारवाई चा फास आवरल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद चा शिक्षण विभागाची चांगलीच दानादिन अवस्था झाली आहे.

👉सुट्टी टाकून पसार ‼️

अँटी करप्शन च्या रडारवर असणाऱ्या शिक्षणाधिकारी कुमारी निखिता ठाकरे या मंगळवारी चौकशीच्या धाकाने रजा टाकून सुट्टी वर गेल्याचे वृत्त आहे? त्या सोबतच शिक्षण विभागातील क्लार्क आणि इतर संबंधित शिक्षण विभागातील कर्मचारी पण अँटी करप्शन च्या कारवाई च्या भीतीने अंडर ग्राउंड झाले आहे.

🌟मोठा भ्रष्टाचार चा गड?

✨✨✨✨✨✨
गेल्या पाच वर्षा च्या कार्यकाळात शिक्षण विभागातील कोट्यवधीचा भ्रष्टाचार या विभागाने केला आहे?
या आधीच्या निलंबित शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण वर ही कोट्यवधीचा भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवत त्यांना राज्य शासनाने सेवेतून निलंबित केले आहे. यांच्याच माळेचे मणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्तमान शिक्षणाधिकारी कुमारी निखिता ठाकरे यांच्यावर सुद्धा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची अटकेची टांगती तलवार लटकत आहे?

✨लवकरच ACB यासंदर्भात ठोस पुराव्यानिशी लाचखोर यंत्रणेला चाबूक लागवणार असल्याचे वृत्त आहे.

✨भ्रष्टाचाराचे पायामुळे?

🌟तत्कालीन निलंबित शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्या कार्यकिर्दीत चांगलेच भ्रष्टाचार ने या विभागातील पायेमुळे रोवले आहे. याच विभागातील पल्लवी परिसे नावाच्या क्लार्क (बाबू )ची सुद्धा चौकशी सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक शिक्षण संस्थातील दानविराने यांच्यावर चांगलीच मेहेरबानी दाखवली आहे.

✨दलालांची भर्ती ‼️

👉चक्क पाच पाच दलाल या बाबूच्या सेवेत भ्रष्टाचाराचे रोवणे करीत आहे. बेधडक पद्धतीने लाचेची मागणी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

✨चौकशी अंती सर्व तथ्य बाहेर येणार – मंजुषा भोसले, पोलीस उपअधीक्षक, ACB

👉लाचलूचपत प्रतिबंधक विभागाची या संदर्भात चौकशी सुरु असून योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.दोषींना कुठलेही अभय दिले जाणार नाही. लवकरच शिक्षणाधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांना चौकशी साठी बोलावून जॉब नोंदवाण्यात येईल. प्रकरनाची सत्यता पडताळणी करून कारवाई करण्यात येईल.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!