चंद्रपूर 15 मे 2025
(सुशांत घाटे )👉राज्य उत्पादन शुल्क विभागातील अनागोंधी कारभार चव्हाट्यावर आला असताना आता खुद्द चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी गंभीरता दाखवत ” भ्रष्टाचार ” संदर्भात चौकशी लावली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागातील भ्रष्टाचार काही लपून राहलाच नाही आहे. याच विभागाचे अधीक्षक संजय पाटील आणि त्यांच्या दोन अधिकारी वर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मागील वर्षी ट्रॅप केला होता.
एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होता होता याच विभागाला आणखी भ्रष्टाचाराची काही लथ कमी झाली नसल्याचे उघड पने दिसतच आहे.
मात्र त्यावर आळा घालणारी यंत्रणा कुठे लपलेली आहे हे सध्या तरी दिसतच नाही आहे.
मात्र डेली पोस्टमार्टम नी राज्य उत्पादन शुल्क विभागातील भ्रष्टाचार आपल्या लेखणीतून समोर आणून राज्य शासनाच्या दफ्तरी मांडला आहे.
त्याचा पाठपुरावा सुरु असतानाच चंद्रपूर जिल्ह्याचे कलेक्टर विनय गौडा नी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कान टोचत चौकशी चे आदेश काढले आहे.त्यातच या चौकशी चा अहवाल राज्य शासनाला ते स्वतः पाठवणार आहे.
सोबतच त्यांना राजुरा येथील बैठक बार मध्ये घडलेल्या प्रकरनाची तक्रार प्राप्त झाली आहे. त्यावर ते खुद्द याची सखोल चौकशी करणार आहे. बार धारकाकडून राज्य उत्पादन शुल्क विभागातील राजुरा येथील निरीक्षक अभिनंदन कांबळे आणि त्याचा सहयोगी कर्मचारी कापटे यांनी 12 हजार रुपये कारवाई न करण्याच्या मोबदल्यात उकळले असल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आले आहे.
रजिस्टर मध्ये दोन दिवसाची सेल ची माहिती न भरल्याने निरीक्षक कांबळे यांनी कारवाई च्या करण्याची भीती दाखवून कापटे नावाच्या कर्मचाऱ्यां मार्फत 14 हजारची मागणी केली असल्याची थेट तक्रार एका सामाजिक संघटना ने जिल्हाधिकारी कडे तक्रार दाराने केली आहे. ड्रॉवर मध्ये 12 हजार रुपये च असल्याने कापटे नी उर्वरित रक्कम नंन्तर नेणार असे बार धारकांला सांगितले.
कापटे हा राज्य उत्पादन शुल्क विभागतील कांबळे यांच्या जवळचा सहयोगी मानला जातो त्यामुळे डिव्हिजन मध्ये कांबळे यांची वसुली साठी कापटे ची पसंती जास्त आहे. या कापटे चा प्रकाश ढाब्यावर दारू पिण्याचा विडिओ वायरल झाला होता. मात्र आतापर्यंत त्याच्यावर कुठलीच कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली नसल्याची बाब पण समोर आली आहे. ज्याच्यावर कारवाई करण्याची धुरा आहे तेच लोक या कायद्याची ऐसी तैसी करीत आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा स्वतः जातीने लक्ष देऊन या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणार आहे. त्यामुळे कारवाई चा फास आवरल्याने राज्य उत्पादन शुल्क विभाग दानादिन झाला आहे.🏵️निरीक्षक कांबळे ची सारवासरव.. आणि बार धारकाला दम?
👉जिल्हाधिकारी विनय गौडा यांची धास्ती घेऊन आगपाकड झालेल्या निरीक्षक अभिनंदन कांबळे यांनी बचाव तंत्रचा फार्मुला घेतला आहे. बार धारकांला दम भरत फक्त व्हिसीट ला आलो असल्याचे सांगण्यास सांगितले आहे. अन्यथा मग आम्हीच आहो करत पाहुण घेऊ असे बाजवल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
या प्रकरनाचा संपूर्ण विडिओ CCTV मध्ये कैद झाला आहे. त्यातही छेडछाड सुरु असल्याची गोपनीय माहिती डेली पोस्टमार्टम ला मिळाली आहे.
मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाला जिल्हाधिकारी विनय गौडा कारवाई चा बिगुल कोणत्या प्रकारे वाजवणार हे येणारी वेळच ठरवेल.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

