Tuesday, August 25, 2026
HomeBreaking Newsग्राउंड रूट वर स्वतः आता पोलीस अधीक्षक? गुन्हेगारी विश्वा सोबत, सर्व नेटवर्क...

ग्राउंड रूट वर स्वतः आता पोलीस अधीक्षक? गुन्हेगारी विश्वा सोबत, सर्व नेटवर्क मोडकडीस काढणार! पोलीस विभागात ही होणार उचल बांगडी? चार ते पाच विशेष पथके बनवणार?

चंद्रपूर – 25 जुलै
सुशांत घाटे

💥💥💥💥
✨जिल्ह्यातील गुन्हेगारी चे डोके वर येत असताना आता,स्वतः खुद्द चंद्रपूर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन नी याचा निपटारा करण्या करीता सूत्र घेतले असल्याचे विश्वसनीय माहिती मिळाली आहे.

💥प्रत्येक गंभीर गुन्ह्यात ते स्वतः संबंधित पोलीस स्टेशन ला दिवस रात्र भेट देत कसून तपास करीत असल्याची बाब निदर्शनास येत असताना त्यांच्या या कडक भूमिकेने पोलीसही धास्तावले आहे.
🕵️जिल्ह्यातील क्राईम ग्राफ आता त्यांच्या थेट रडारवर आला असून,त्यांनी गोपनीय सूत्रांद्वारे माहिती गोळा करणे सुरु केले आहे. भविष्यात जिल्ह्यातील गुन्हेगारी यंत्रनेला ते ठेचून काढणार असल्याचे बोलल्या जातं आहे.

👁️जिल्ह्यातील कुठलीही गंभीर घटनेला सडेतोड उत्तर देणारा प्रामाणिक अधिकारी म्हणून आय. पी. एस.मुम्मका सुदर्शन प्रख्यात झाले आहे. जिल्ह्यातील पोलीस बदलीत ना नेत्यांचे, ना अधिकाऱ्यांचे एक न ऐकता पारदर्शक पद्धतीने त्यांनी बदलीचा तक्ता बनवत योग्य विल्हेवाट लावली आहे.
या आधीच त्यांनी पोलीस विभागाला सूचना देत ठणकावले होते.ज्या पोलीस स्टेशन च्या हद्धीत क्राईम ग्राफ आटोक्यात येत नसेल तर मग ते       निपटवणार?
👉दिवस रात्र एक करीत चोवीस तास जवाबदार पद्धतीने जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन सध्या हाय वोल्टेज ऍक्शन मोड वर आले आहे.

♨️जिल्ह्यातील काही पोलीस अधिकारी सायलेंट झोन अवस्थेत पहायला मिळत असून त्यांचीही आता उचल बांगडी लवकरच होणार असल्याचे सूत्रा कडून माहिती मिळाली आहे. एकाच महिन्यात तीन मोठ्या घटनेने चंद्रपूर जिल्ह्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असताना त्यात पोलिसांनीही आरोपीनचा शोध घेत जेरबंद केले आहे.

👉जिल्ह्यातील पोलीस यंत्रणातील कामचोर पोलिसांना लवकरच दणका दिल्या जाणार असल्याचे ही गोपनीय माहिती मिळाली आहे. पोलीस विभागातील ही चांगल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या योग्य पात्रतेनुसार वर्णी लावण्यात येणार आहे.

🎇लवकरच पोलीस अधीक्षकांचे विशेष चार ते पाच पथके गुन्हेगारी विश्वावर नजर ठेवणार असून त्यांची गैरकृत्या करणाऱ्या गुन्हेगारावर  मोठी कारवाई करण्याचे संकेत मिळाले आहे. 👉पोलीस विभागातील चंद्रपूर शहर, रामनगर, बल्लारपूर या डिटेक्टिव्ह ब्रांच सध्या उल्लेखनीय कामगिरी करीत आहे. ज्या पोलीस विभागात चांगले कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा सहवास असतो त्या पोलीस स्टेशन च्या हद्धीत गुन्हेगारांचे नेटवर्क उध्वस्त करणे काही मोठी गोष्ट नाही आहे.

🏮पोलीस विभागातील ही ज्या कर्मचाऱ्यांचे गुन्हेगारी यंत्रनेला छुपा पाठिंबा आहे त्याचा ही पोलीस अधीक्षक स्वतःच नेटवर्क तयार करीत शोध घेत आहे. येणाऱ्या काळात चंद्रपूर जिल्ह्याला शांतीप्रिय बनवण्यासाठी पोलीस अधीक्षक स्वतःच ऍक्शन मोडवर आले आहे. आता पर्यंत च्या कार्यकिर्दीत पहिल्यांदाच ग्राउंड रूट वर स्वतः हजर राहून पारदर्शक कामाची पावती देणाऱ्या पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन हे पहिले IPS दिसत आहे. कोणत्याही अमिषाला बळी न पडता थेट कारवाई चे आश्वासन देणारे ते एक उत्तम अधिकारी म्हणून ओळखल्या जात आहे.

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

RELATED ARTICLES

Today Live News

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!