चंद्रपूर – 24 जुलै
सुशांत घाटे
💥💥💥
नागपूर परिक्षेत्रा चे नवनियुक्त पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ हे चंद्रपूर जिल्ह्याचा आढावा घेण्याकरीता आले आहे.
👉काल झालेल्या राजुरा येथील गोळीबार प्रकरनाचा छडा लावण्यात यश संपादन करणाऱ्या जिल्हा पोलीस प्रशासनाला अवग्या सहा तासात आरोपीना अटक केली आहे.
पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ हे राजुरा येथे घडलेल्या प्रकरनाचा आढावा घेण्या करीता प्रथमता नवनियुक्त झाल्या नंतर चंद्रपूर जिल्ह्यात आले आहे. पोलीस प्रशासनातील कठोर शासनाचे अंमलबजावणी करीता ते प्रख्यात आहे. यवतमाळ जिल्ह्यात पोलीस अधीक्षक पदी असताना त्यांनी अवैध धंद्याचे पायेमुळे नष्ट केले होते.अत्यंत कामाप्रति रुची ठेवणारे IPS तुकडीतले अधिकारी म्हणून डॉ. दिलीप भुजबळ यांची ओळख आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत चालेलला गुन्हेगारी चा ग्राफ म्हणजे क्राईम कॅपिटल कडे तर वाटचाल नाही ना, हे कळाला सध्या तरी मार्ग नाही. मात्र पोलीस प्रशासनाला गुन्हेगारी यंत्रनेवर ठोस कारवाई करणे ही काळाची गरज आहे. डेली पोस्ट मार्टम ने या आधीच चंद्रपूर जिल्ह्यात चार महिन्या आधी सहाशे बंदूक चंद्रपूर जिल्ह्यात आल्याचे भाकीत वृत्त प्रकाशित केले होते. हळू हळू जिल्ह्यात क्राईम साठी बंदुकी चा वापर होत असताना आता त्यावर शिक्कामोर्तब लागल्या चे दिसत आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.

